गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : मदत सामाजिक संस्थेद्वारे निशा खापरे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नारीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गुरुदेव सेवा मंडळ येथील दालनात 24 डिसेंबर 2024 ला या संस्थेचे अध्यक्ष नील लाडे सचिव दिनेशभाऊ वाघमारे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
निशा खापरे या गेली नऊ वर्षापासून साहित्य क्षेत्रात कार्यरत असून त्या काव्यप्रेमी शिक्षक मंच या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी आतापर्यंत या संस्थेच्या बॅनरखाली सात काव्य संमेलन आयोजित केलेली आहे. ज्या स्त्रियांनी देशासाठी मोलाचे योगदान दिले त्यांच्या कार्याचा जागर व्हावा या उद्देशाने त्या दरवर्षी “स्त्री शक्तीचा जागर” ही नऊ दिवसीय स्पर्धा नवरात्रीत गेली चार वर्षापासून राबवत आहे. विविध उपक्रम राबवून त्या लिहित्या हातांना बळ देण्याचे कार्य सतत करीत असतात. साहित्यातून समाज प्रबोधनाचे काम करणे हाच त्यांचा साहित्यातील उद्देश आहे. इतर अनेक साहित्यिक कार्यक्रमात त्यांनी संयोजक म्हणून पण काम केलेले आहे. त्यांनी “समतेचे नायक”, “वासल्याचा झरा” या ई-बुकची पण निर्मिती केलेली आहे.
त्यांनी आतापर्यंत साहित्यक्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन मदत सामाजिक संस्थेने त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नारीरत्न हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्याबद्दल मित्र परिवाराकडून, साहित्य परिवाराकडून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!