नवलेखकांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला अनुदान योजना

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून सन २०२५ या वर्षासाठी आतापर्यंत एकही पुस्तक प्रकाशित झालेले नाही, अशा नवलेखकांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला अनुदान देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

नवलेखकांनी दि. १ ते ३१ जानेवारी, २०२५ या कालावधीत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर  इमारत, मुंबई येथे आपले साहित्य पाठवावेत. या योजनेसाठीचे माहितीपत्रक, विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर तपशील महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या अंतर्गत नवलेखक अनुदान योजना 2025 माहितीपत्रक व अर्ज’ या शीर्षाखाली तसेच ‘What’s new’ या अंतर्गत ‘Navlekhak Grant Scheme Rules Book and Application Form’ या शीर्षकाखाली तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५. दूरध्वनी क्र. २४३२ ५९३१ यावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

Leave a comment