शहरात मतदान जनजागृती तिरंगा महारॅली
जागृत नागरिक होऊ या, अभिमानाने मत देऊ या;
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-२०२४ च्या अनुषंगाने व्यापक मतदान जनजागृती करीता प्रशासना बरोबर विविध स्वयंसेवा संस्था, व्यापारी, व्यावसायीक, औद्योगिक, शिक्षक, कर्मचा-यांची व इतर संघटना पुढे येवुन आपला सहभाग नोंदविण्याचे निश्चित केलेले आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारीत निश्चित वाढ होण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस विभाग व महानगरपालिका, अमरावती मार्फत सोमवार दिनांक ११/११/२०२४ दुपारी ४.०० वाजता नेहरु मैदान, राजकमल चौक, अमरावती येथुन “मतदान जनजागृती तिरंगा महारॅली” चे आयोजन करण्यात आले होते. नेहरु मैदान येथे सर्वप्रथम पथनाट्य सादर करण्यात आले. तिरंगी बलून सोडून यावेळी मतदान जनजागृती करण्यात आली. पोलीस बॅंड पथकाद्वारे मानवंदना देवून या अभियानाचे सुरुवात करण्यात आली.
मतदानाचे महत्त्व सांगून आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत १०० टक्के मतदान गाठण्यासाठी, जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासन जनजागृती कार्यक्रमाचा भाग म्हणून शहरात विविध कार्यक्रम आयोजित करत आहे.
जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा व महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी सोमवारी नेहरु मैदान, राजकमल चौक येथे “मतदान जनजागृती तिरंगा महारॅलीला” हिरवा झेंडी दाखवून या रॅलीत पोलीस उपायुक्त सागर पाटील, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त कल्पना बारावकर, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त श्यामसुंदर देव, अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, शिक्षक वर्ग, आरोग्यसेविका, पारिचारीका, महिला बचत गट, मनपा कर्मचारी, मनपा कंत्राटी कर्मचारी, विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.