अनामिका पोल्हाड यांचे निधन
गौरव प्रकाशन तिवसा (प्रतिनिधी) : नजीकच्या भांबोरा ता. तिवसा जिल्हा अमरावती येथील प्रतिष्ठित नागरिक तथा एक उत्कृष्ट दिग्दर्शक आणि रिफॉर्मर इन्स्टिट्युट पुणेचे संचालक श्री. आशिष दिलीपराव पोल्हाड यांच्या सुविद्य पत्नी अनामिका आशिष पोल्हाड (वय ३७ वर्ष) यांचे आज दिनांक ४ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता निधन झाले आहे.
काल अचानक त्यांना अस्वस्थ वाटल्याने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांनी मृत्यूला कवटाळलं. त्यांचेवर भांबोरा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या पश्चात पती आशिष, मुलगा मल्हार, सासरे दिलीपराव, दीर अतुल सह बराच मोठा आप्तपरिवार आहे.
विशेष म्हणजे अवघ्या सहा महिन्यांपूर्वी आशिष पोल्हाड यांचे आईचे निधन झाले होते. त्यात अनामिकाचे अचानक जाणे सर्वांना चटका लावून गेले. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण गाव हळहळले.