दीपोत्सव म्हणजे काय?
ज्ञानाचे पिसारे फुलवून, शतकांचे अज्ञान घालवून प्रकाशाची अंतरिक्षे ज्ञानदिपाने व्यापली जातात, तिथे देव, परलोक, स्वर्ग, मोक्ष, दैव, अशा कोणत्याही बालिश गोष्टींना जागा नाही ,त्यालाच जीवनातील पूर्णावस्थेला नेण्यार-या ज्ञानाला दिपत्सोव म्हणतात.
जो इतिहास विसरतो तो इतिहास लिहू शकत नाही. असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात! जोतिबा फुलेसारखी सत्यशोधक वृत्ती हेच ज्ञानध्येय असते. यालाच दिपत्सोव म्हणतात ! बहुजनांचा बलाढ्य राजाला हरविणारा कुणीही पैदा झाला नव्हता,तिन्ही लोकांना हरवणारा असा महाप्रतापी, लोकांच्या सुखदुःखाचे प्रसंग जाणून घेणारा लोकांना जपणारा असा बळी राजा होता! या राजाला धोक्याने, कपटाने मारले ! त्यानंतर वामन नाव असलेला बटूकाची कथा रचली म्हणून आज ही कँलेड़र पाहातुम्ही बलीप्रदा याच दिवशी बलीचा पाडाव झाला म्हणून दिवाळी साजरी करतात !
हिरण्यकश्यपाला तसेच मारले! हिरण्यकश्यपाला हा मोठा पराक्रमी योध्दा होता. त्यांच्या राज्यात दैव.दैववाद, अंधश्रद्धा हद्दपार झाली होती. त्यामुळे ब्राम्हणांचे दुकान बंद झाले. शेवटी त्यांनी एक युक्ती केलीसंक्रांती. आणि विक्रांती या दोन सुंदर तरूणीना हिरण्यकश्यपाकडे पाठवित आले.तेव्हा धोक्यात हिरण्यकश्यपाला मारण्यात आले!हिरण्यकश्यपाचा मुलगा प्रल्हादला राजा केले कारण तो वैदिकांच्या हातातील बाहुले बनवून जगू लागला होता .तितकाच जनतेसाठी निष्ठावंत होता, पण शेवटी त्यालाही धोक्यानेच मारले?नंतर प्रल्हादचा पुत्र बळी हा महापराक्रमी निघाला.त्यांच्या राज्यात लोक, दैववादी नव्हते.किंवा.देवावर त्यांचा विश्वास नव्हता, यामुळे तो तिन्ही लोकांना भारी पडत होता.त्याच्या राज्यात धनधान्याची रेलचेल असायची.अंधश्रद्धा मुक्त होऊन लोक जिवन जगायचे .कुणीही कुणावर अन्याय न करता गुण्यागोविंदाने नांदत असायचे! यालाही विषमतावाद्यांनी पाठीत खंजीर खुपसून मारले, बहुजनांचे राजे हे देवधर्म मानत नव्हते. ते बुद्धाची शिकवण आचरणात आणतं असतं ! राजा बळी यांचा पराभव केला. एका बटुक वामनाने केला, तीन पावलांची जमीन मांगितली. नंतर तीन पावलांने त्यांचे राज्य हिसकावून घेतले. त्यालामारण्यात आले. हाच तो दिवस म्हणजे बलीप्रदा असतो. या दिवशी मनुप्रणीत लोकांनी. गोडघोड करून दारात दिवे लावून उत्सव साजरा केला.आपल्या बहुजन राजाचे आपण दुश्मन आहोत काय?
नाही नं..!
नंतर दिवाळीला वेगळे रूप दिल्या गेले. लोक बळी राज्याला विसरू शकत नव्हते म्हणून लोकांना सांगण्यात आले.आज तुमचा बळी राजा परत येतो म्हणून दिवे लावून त्यांच्या आठवणीत हा दिवस साजरा करा.लोक भावूक झाले आणि,म्हणू लागले, इडा, पिडा टळो, बळी राजाचं राज्य येवो. आज ही लोक म्हणतात. कित्येक युगापासून बळीची वाट बघत आहेत.डोळ्यांत आशेचा दीप सजवून .आपण बळी राजाच्या मृत्यू दिवस आनंद उत्सव म्हणून साजरा करणार आहोत काय?
ज्या घरात बुद्धाची पुजा होते.तिथे अंधकार राहत नाही. तिथे सुख संपन्नता येते लक्ष्मीची पुजा केल्याने माणूस गर्व करतो. कामवासनेत तल्लीन राहतो म्हणून लक्ष्मीची पुजा केल्याने धनप्राप्ती होत नाही.
दिवाळी म्हणजे ज्ञानबिंदूत्तत्वाचे बिजाकुंर जोपासने होय, ज्ञानसंपदेचा प्रकाश !त्या प्रकाशात सर्व समान असतात, असे ज्ञान त्या ज्ञानाने दुःख नष्ट होऊन सुखाची बरसात होते.
असे ज्ञानकुंर बुद्धकाळात होते समाजातील अराजकतेचा
अंधार दूर करून नव प्रकाश निर्माण करणारी दीपमाळ हे म्हणजे दिपत्सोव आहे !ज्ञानाचे,शोधाचे ,प्रकाशाचे प्रतीक प्रकाशाला संबोधित जाते ..दीप हे ज्ञानाचे प्रतिक आहे.या ज्ञानाच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार, अंधश्रद्धा, अज्ञान दूर व्हावा,म्हणून हा दीपोत्सव आहे.
पावसाळा ऋतू असल्याने घराला कुंबटवास येतो. त्यामुळे घरातील साफ सफाई होत नाही. कार्तिक महिण्यात चंद्रचा प्रकाशचक्क आणि शितल असतो , आरोग्यास लाभदायक असतो.त्यामुळे गोड, स्निग्ध, तिळाचे पदार्थ हे शरीरातील ऊर्जा वाढविण्यासाठी उपयुक्त असतात.त्यामुळे ही प्रचलित रूढीच होती. एक हजार वर्ष होत आहे.दिवाळीचा उत्सव सुरू करण्यासाठी. पण आपण लक्षात घेतले पाहिजे ? कि, बुद्ध वैदिक युगाच्या आधीचा आहे.बुद्धकाळाला आता अडीच हजर वर्ष पूर्ण झाले आहेत.
बुद्ध कपिलवस्तूला. सात वर्षानंतर.आले म्हणून संपूर्ण नगरीत दिपोत्सव साजरा झाला?होता?हा पहिला पुरावा आहे.या पुराव्याने बुध्द दीपकंर यांच्या ज्ञानातुन ज्ञानाकुंर उजागर होतात, त्या नंतर सम्राट अशोकाने धम्मसंगती घेतल्या नंतर प्रकाशपर्व चालूच ठेवले, आजही झेंडूचेच फुले दिवाळीला लागतात ,कारण झेंडूचे फुल हे त्यागाचे ,केसरी, रंगाचे आहे.
भारत हा देश शेतीप्रधान आहे.त्यामुळे शेतातील पीक घरी येते.शेतकरी खुष असतात.याच कारणामुळे शेतकरी काही काळ तरी आनंदात असतात ,पण हिंदू रिती-रिवाजाने शेतकऱ्यांना पराभूत केले. म्हणून गाडगेबाबा म्हणतात,कर्ज काढून सण साजरा करू नका, दिवाळी म्हणजे तुमच्या मनातील अंधश्रद्धेचा अंधकार काढणे त्याला दीपोत्सव म्हणतात!
दिवाळी म्हणजे. गुलामी नाकारणे, जातीयतेचा अंधार नष्ट करणे ,स्वंयसिध्दा होणे. प्रकाशाकडे जाणे. मानसिक दुःखातून अहंकाराच्या अग्नीतून.अंधाराच्या भयापासून मुक्त करण्यासाठी दिपमाळेचे प्रतिक वापरले आहे. प्रकाश वाईटावर विजय मिळवते. अज्ञानाचा पराजय करते, ज्ञानाचा विजय म्हणजे दिपोत्सव होय.
पुराणातील व्याधीने लोक,मानसिक बिमार झालेले आहेत. त्यामुळे दैववाद ,कपट, कारस्थान , दुसऱ्याला जळणे.हे आपल्या परिसरातील गडद सावल्या झाल्या आहेत. नकारात्मक आणि शंकाचे वैफल्य दूर व्हावे यासाठी दिपोत्सव असतो.
दिवाळी हा सण एक हजार वर्षापूर्वीपासून करतात.पण का करतात?.हे कुणीच शोधत नाही. लक्ष्मी म्हणजे पैसा, पुजा केल्याने.धनप्राप्ती होत नसून असलेला पैसा घरातून निघून जातो,, आपल्याकष्टावर विश्वास ठेवा कुशलकर्म करा तेव्हाच माणूस विचाराने श्रीमंत होतो.पैश्याची श्रीमंती क्षणीक असते, ज्ञानाची श्रीमंती ही सदोदित चालते.
पौराणिक कथेच्याआधारावर श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. ती आठवण राहावी म्हणून दिपोत्सव साजरा करतात, अनेक पुराणातल्या गोष्टी आठवून आठवून हा दिवस साजरा करतात! बहुजनांच्या बलीराजाला मारले ते बरोबर बुध्दपर्व असलेल्या दिवसाला त्यामुळे हा आनंंद वैदिकांनी लुटला त्याच बरोबर बुद्धपर्व लयास गेले.
रावण हा दसशीलं पाळणारा होता.तो विद्धान होता.त्यांने सितेला पळवून नेले नाही! वाचा रामास्वामी पेरीयार .यांचे रामायण चाबी , हे पुस्तक .तरी पण त्याला दस-याला जाळतात यावर ही आता साहित्यिक लोकांनी लिहीयाला हवे. हे युग प्रबोधनाचे युग आहे आपल्या मनातील अंधार नष्ट करण्याचे सामर्थ्य फक्त लेखणीत आहे तिच बहुजणांची पणती आहे.ती विस्तवासारखी प्रज्वलीत ठेवा.
डाॅ, बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या बावीसप्रतिज्ञा दिल्या आहेत .त्यांचे पालन करा. अंधश्रद्धा सोडा ,समुद्र मथंनातुन चौदा रत्ने निघाले, हे आज सिद्ध करून दाख़वा म्हणा,
माणसापेक्षा जनावराला जास्त महत्त्व देणारे ,माणसाला माणूसपण नाकारणारे लोक म्हणजेच वैदिक होत. कथा रूपाने, लिहिलेल्या पुराणातील कथांना देवत्त प्राप्त करून जनमानसात त्या दैववादी साहित्याचीमांडणी केली.
सर्वसामान्य माणसाला दैववादात गुंडाळून ठेवले, त्यांच्या कमाई वरच आपल्या पिढ्या न पिढ्या पोसल्या गेल्या तरी बहुजनांचे डोळेच उघडत नाही. कारण जगात देवच नाही. जो देव देव करतो त्याचा मात्र खेव होतो ऐवढे मात्र निश्चितच..
प्रज्ञानतेची एकच पणती ती असंख्य क्षणीकपण छोट्याशा ज्योतीमधून ज्ञानाचा प्रकाश निघावा .ज्ञान प्रकाशाने अंधाराच्या गुलामीच्या, जातीयतेचा रूढीपरंपरेचा अंधार नष्ट करावा ,आणि समानतेच्या प्रकाशात जातीविरहित माणूस निर्माण व्हावा,विचारप्रज्ञतेच्या उजेडात संविधानाच्या लख्ख उजेडात माणूसमाणसाचे नैतिक बंधन पाळणे म्हणजेच दीपोत्सव होय.
देवदेवतांची पूजा केल्याने कुणाला काहीच प्राप्त होत नाही. उलट माणूस चिखलात दलदलीत फसतो.स्वतःला सावरा या दैववादातून बाहेर पळा ! देवच नाही जगात तरी देवाची पुजा केल्याने धनप्राप्ती, सुखप्राप्ती ,मानसिक सुख ,बौध्दिक क्रांतीची उन्नती ,लाभली असेल असा एकही व्यक्ती नाही. जो व्यक्ती देवाने मला सगळेच वैभव दिले म्हणतो. तोच स्वताःची घोर आभासी व्यक्त मानसिक अवेहलना करतो
जो माणूस कष्ट नं .करता ऐश आरामात जगतो ,लोकांना लुबाडतो त्याला ब्राह्मण म्हणतात,फक्त लोकांना बेवकुब बनवणे या भारतात सहज सोपे आहे.देवाच्या नावाखाली धर्मांदपणाचा ऊत आलेला आहे.म्हणून जो कष्ट करेल तोच श्रेष्ठ ठरेल.तर.,मग .कष्ट कोणते घ्यायचे माणसाने सहजसोपे कष्ट म्हणजे काय?लोकांना या अधंश्रध्देच्या गरतेतून काढणे म्हणजे मानसाच्या सुक्ष्म मनाची मशागत करणे होय..
एक जरी पिढी तयार झाली .तरी चालेल तर ,येणाऱ्या अकुरावंर ते संस्कार करून आपले रक्षण करेल अराजकतेवंर सम्यक बुद्धत्तत्वाचे विचारच जगावर छाप सोडते आणि क्रांतीची मशाल पेटवते.
आजही दिवाळीची पुजा झेंडूच्या फुलाविना होत नाही.कारण
झेंडुचे फुल हे तपस्वी आहेत?त्यागमय आहे.चिवरासारखा त्यांचा रंग केसरी आहे.त्यांच्या असंख्य पाकळ्याच्या मधोमध फुललेला पराग कण असंख्य आजारात त्यांची बिजे काम करतात .याचा अर्थ दिवाळी ही ज्ञानाचे प्रतिक आहे.तथागत बुद्ध जेव्हा कपिलवस्तूला परत आले तेव्हाच शुध्दोधन राजाने संपूर्ण नगरी ही दिव्याने प्रकाशित केली होती.शुद्धोधन हा राजा महान पराक्रमी होता.म्हणून तो दिपोत्सव करण्याची प्रथा पडली नंतर अशोक राज्याचा, अंधारातून प्रकाशाकडे नेणार-या दीपोत्सवाला बघून वाटते कि .अंधारात आहोत अन माणूस माणसाच्या गर्दीत हरवलेला आहे.आणि माणूस सापडून देण्यासाठी जणू दिव्यांची रांग क्षणीक लावल्या जात आहे.आणि त्या दिव्यांचे अवडंबर केल्या जात आहे,
भारतातील सर्वंच उत्सव हे शेतकऱ्यांना समर्पित आहेत…
लक्ष्मीची पुजा न करता आपल्या घरातील महिलेला एक दिवस जर पाटावर बसून तिला ओवाळले आणि तिला सन्मान दिला तर तुमच्या घरात लख्ख प्रकाश पडू शकतो. ऐकीकडे स्त्रीयांना देवीचे रूप देऊन तिची मनोभावे पूचाअर्चना करावी. दुसरीकडे तिच्यावर अन्याय अत्याचार करावा ,हे चित्र आजकाल दररोज घडत आहे.याला जबाबदार कोण तर आपले पोथी पुराण आहे..कारण महिलांना पायाखाली ठेवण्यासाठी तयार केलेली ही अवस्था पुराणातून जन्माला आली आहे.
कार्तिक अमावस्या या दिवशी जो अंधकार असतो तो अंधाकार हा बहुजनांच्या राज्यावर प्रहार करण्यासाठी वापरलेले एक हत्यार आहे.त्या हत्यारातून दिवाळीचे प्रतिक निर्माण झाले आहे.तसे पाहता सांचीच्या स्तुपावर जे शिल्प आहेत त्या शिल्पावरून लक्ष्मीचे रूप देण्यात आले आहे, अनेक कथा रचून लक्ष्मी निर्माण केली वास्तविक पाहता ते सांचीच्यास्तुपावरील चित्र हे सिद्धार्थ बुद्धाची आई ही माहामाया होय…
जो पर्यंत आपण शिक्षण घेत नाही जोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारचे काम करत नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. म्हणून सावित्रीबाई म्हणतात ज्ञान नाही विद्या नाही ,ते घेण्याची ओळ नाही तयास मानव म्हणावे. दे. हरी पलंगावरी,तयास मानव म्हणावे..
जोपर्यंत मी ,मोठा,हा लहान , हा श्रीमंत. हा गरिब, ही जातीयता नष्ट होत नाही तिथे दिवा तेलाचा लावा तुपाचा लावा काहीही फायदा होत नाही, शेवटी आपणास अंधारच दिसणार आहे. म्हणून बुद्ध म्हणतात प्रज्ञानी व्हा ,माणसाने माणसासारखे वागावे, प्रज्ञावान व्हा, ज्याप्रमाणे वाऱ्यामध्ये प्राणवायू आहे.त्याच प्रमाणे माणसात समानतेचा प्राणवायू असायला हवा तेव्हाच माणसे जगू शकतात.नाही तर जिवंत माणसे कमी ,विचारहिन माणसे जास्तच दिसतात.
लक्ष्मीची पूजा केल्याने जर लक्ष्मी येत असेल तर विकणारे लोक लक्ष्मी कशाला विकत असते? ,तिचा लिलाव कशाला करत असते?,लक्ष्मी म्हणजे पैसा,द्रव्य, समृद्धी ही लक्ष्मीच्या चित्रात नसते तर माणसाच्या कार्यकर्तुत्वानुसार तिचे मापदंड असते.लक्ष्य ही काही समुद्रमथंनातुन आलेली नाही. ही माणसाच्या गरजेतून निर्माण झाली आहे?
इमानदारीने ,नियमानुसार ,कुणाला न फसवता केलेले कार्य असते तेच कार्य सदोदित जिवंत चैतन्य निर्माण करते.
लक्ष्मीचा जो कुणी अट्टाहास करतो.तिला मिळविण्यासाठी हा खोटा मार्ग होय. स्वताःला भुरविणे आणि दैववादात पडणे म्हणजे जिवन अंधकारमय करणे होय! जणू काही श्रीमंतीच्या तोलामोलाचा तिला मिळविण्या साठी हा अंध आभाशी खेळ मांडलेला आहे.पण… यामधून काहीही साध्य होणार नाही.
– सुनीता इंगळे
मुर्तिजापूर
7218694305