संघर्षाच्या मशाली बनू
Contents
hide
अंधाराचे थैमान माजले
आपण सारे गाफील का?
संविधानही धोक्यात म्हणतो
तरी आपण विभक्त का ?
क्रांतिसूर्य ही आपल्या हातात
काजव्यावर विसंबून राहता का ?
देश विकायला काढणाऱ्यांना
सत्तेत आपण बसवता का..?
कालचे लढणारे शूर होते
आज शेळी बनले का.?
ज्वालामुखीची विद्रोही आग
आज थंड झाली का ?
निर्मिक त्याला पावन झाला
असे न्यायाधीश म्हणतो का?
निकालांतील विसंगती तरी
त्यांना सुप्रीम म्हणतो का .?
कायद्याच्या राज्यामध्ये
अनागोंदी माजते का ?
एका विचाराचे झाल्यावर
सांगा न्याय मिळणार का?
अंधाराने व्यापला प्रदेश
असे घरी दडून का?
संघर्षाच्या मशाली बनू
काळोखाला जाळू नाही का..?
संदीप गायकवाड
नागपूर
9637357400