रतनजी!
रतनजी !
कसं जमतं
तुम्हाला हे सर्व
इतकी मोठी श्रीमंती
इतका मोठा पैसा
इतकं मोठं वैभव
पण
अहंम कधी पाहिला
नाही तुमच्यात
मी मोठा
मी मोठा म्हणून
कधी मिरवायची
गरज वाटली नाही तुम्हाला
आकाशाला गवसणी घालण्या इतपत
सारं वैभव आहे
तुमच्या कडं
पण कुठला अभिनिवेश नाही
की नाही गर्व
सोबत लवाजम्याची गरजही
वाटत नसावी तुम्हाला
सुखसोयी असतानाही सर्व
देश संकटात सापडलाय
हाक मारण्याची गरज
पडली नाही तुम्हाला
हाहाकार होण्याआधीच
हजर झालात
तुम्ही प्रत्येक वेळी
औदार्य दाखवलं
तोही तोही भरघोस
आणि धावत आलात
देश संकटात सापडल्याची
कुणकुण जरी लागली तुम्हाला
तरी ओ देण्याआधीच
कान टवकारले जातात तुमचे
डोळे
त्या दिशेचा वेध घेतात
पाय त्या मार्गाने
चालायला लागतात
आणि हात आपोआप
तो इशारा
समजून घेतात
आम्हाला बघा
सवयच जडलेली आहे की
वितभर करून
आणि हात भर सांगायची
तुम्हाला असं का कधी वाटलं नाही?
स्वत:चा मोठेपणा मिरवावा जनमानसात
एखाद्या अदृष्य प्रतिमेसारखं
दोन्ही हातांनी भरभरून द्यावं
आणि गाजावाजा न करता
निघून जावं
रतनजी
तुमच्या सारखी अनेक लोकं
मंदिरात
गुप्त दान देतात हो!
जिथे निर्जीव मुर्त्या असतात
पण शाळेला कोणी
दान देत नाही
जिथे जीवंत देव बसतात
पण लोकं म्हणतात
तो काळा पैसा असतो
म्हणून तो अंधारातच देता येतो
कारण काळे कामं
अंधारातच करायची असतात म्हणे
पण तुम्हाला असं म्हणायची
हिंमत कोणी केली नाही
आतापर्यंत
करणारही नाही म्हणा
कारण तुम्हाला
पैसा लपवायची
कधी गरजच भासली नाही
तुमचं आपलं खुलं
सुर्य प्रकाशा इतकं
मुंबईवर आतंकवादी हल्ला झाला
कुठलाही वेळ न घालवता
मदती साठी
तुम्ही पुढे आलात
कोरोनाच्या संकटात
तर तुमच्या औदार्यानं उदारतेनं
जनमानसाला
भुरळच घातली म्हणे
किती किती प्रसंग सांगायची
मोजता येणार नाहीत इतकी
मोठमोठे मान सन्मान
तुमच्या पर्यंत चालत आलेत
मला द्या असं म्हणायची
वेळ आली नाही तुमच्यावर
तरीही तुमचा स्वभाव
कधी बदललेला पाहिला नाही
जसाचा तसाच
नाहीतर आम्ही बघा
किती उंच उड्या मारतो
आम्ही केलं
आम्ही केलं
दुःख याचं वाटतं
रतनजी
जे तुम्हाला जमलं
ते इतरांना का जमू नये?
हेही ठिक आहे बरं का?
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती
प्रत्येकाचा स्वभाव वेगळा
प्रत्येकाचं वागणं बोलणं वेगळं
हे एकदा सर्व मान्य
करता येईल हो!
पण
तुमच्या पावलावर पाऊल ठेवून
इतरांना चालता येणार नाही का?
तुमच्या सारखं औदार्य
तुमच्या सारखी उदारता
दाखवता येणारच नाही का?
मग आम्ही का लागलो
लोकांना
लुटायला, लुबाडायला?
पोतेच्या पोते भरले हो !
आम्ही
इतरांना जनतेला लुटुन
दाम दुप्पट करून
हे धन हा पैसा
आम्ही सोबत
नेणार नाही ना!
रतनजी
मग तुम्ही का बर
तिवाळ्यावर उभं राहून
उफनताय हा पैसा
आम्ही सोबत नेणार आहोत का?
नाही ना!
मग तुम्हाला जे जमलं
ते तुमच्या आमच्या
सारख्या इतरांना
का जमलं नाही?
का जमत नाही?
का जमत नाही?
रतनजी
रतनजी
पि के पवार (मुख्याध्यापक)
सोनाजी महाराज हायस्कूल सोनाळा
ता संग्रामपूर जि बुलढाणा
९४२१४९०७३१