एक वर्ष होऊन गेल.!
तरी पन रोज कुठना कुठ #बिब्बा प्रवास करत हाय…इतक प्रेम या काव्य संग्रहाले भेटन मंजे मया सारख्या माणसा साठी नवलच हाय…
Contents
hide
आज बर्याच दिवसान बिब्ब्याच्या बाबतीत लिहाव वाटल त्याच्या प्रवासाच चित्र टाकाव वाटल…
लब यु रसिक मायबाप हो…
एक नविन कविता…रसिक मायबापास समर्पित…
खांदे शोधू मरणा अगोदर
पेटून उठा सरणा अगोदर
पाझर फुटेल तर बर होईल
नदी आटेल धरना अगोदर
सहा होती पांडवांची संख्या
कृष्ण हारला कर्णा अगोदर
जगास सांगतो अंधार बुडाचा
घे ना वेड्या तु प्रेरणा अगोदर
व्याज जीवनाचे वाढत चालले
मुद्दलाचा कर भरना अगोदर
– विजय ढाले
#बिब्बा