या गल्लीतली कुत्री
Contents
hide
या गल्लीतली कुत्री
त्या गल्लीत जातात
मग त्या गल्लीतली कुत्री
गुरगुर करू लागतात
एकमेकांवर भुंकतात
नंतर एकमेकांची हुंगतात
मधूनच एखादं कुत्रं
सूर लावून रडत असतं
ते कुणासाठी रडतंय
त्याला कधीच कळत नसतं
खायला मिळालं की
सगळी तुटून पडतात
एकमेकांना चावतात
आणि तिथंच
पाय वर करून मुततात
मग त्या गल्लीतली काही
या गल्लीतली काही
एकत्र येऊन मिसळतात
त्यातली काही
हळूहळू पिसाळतात
मग सगळ्याच कुत्र्यांना
एकमेकांची सवय होते
काहींची आघाडी होते
काहींची युती होते
आणि कळतच नाही
गल्लीची दिल्ली कधी होते..
कवी नितीन चंदनशिवे
कवठेमहांकाळ
सांगली.
070209 09521
(कवितेचा राजकारणाशी तिळमात्र संबंध नाही.)