अमरावती : दत्तक प्रक्रियेस प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी महिला व बाल विकास विभागाव्दारे जिल्ह्यात दि. 14 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत दत्तक सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या अनुषंगाने बालकांसंदर्भात काम करणाऱ्या जिल्हास्तरीय यंत्रणांमार्फत ठोस दिशादर्शक कार्यप्रणाली तयार करण्यात आली असुन विशेष दत्तक संस्थेतील बालकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात दत्तक विषयासंबंधी काम करणाऱ्या अशासकीय, विशेष दत्तक संस्था यांनी बालकांची देखरेख व काळजी कशी घ्यावी, याचे मार्गदर्शन विशेष कार्यशाळेच्या आयोजनातून देण्यात येईल.
जिल्ह्यातील सर्व प्रसुतीगृहे, रुग्णालये, महानगरपालिका परिसर , शासकीय कार्यालय परिसर येथे कायदेशिर व सुरक्षित दत्तक प्रक्रिया समर्पन बाबतच्या माहितीचे फलक दर्शनिय भागात लावण्यात येणार आहे. या जनजागृतीच्या माध्यमातून अवैधरित्या दत्तक प्रक्रिया आळा घालण्यात येईल, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.