भांडणापेक्षा समझोता बरा, मिळेल त्यातच आनंद खरा
अमरावती, दि. 1 : न्यायालयात प्रलंबित असलेले जनता तसेच पक्षकारांचे खटले व दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्याकरीता संपूर्ण भारतामध्ये येत्या 12 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या ‘राष्ट्रीय लोकअदालत’चा जिल्ह्यातील सर्व जनता, पक्षकारांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी-फलके व जिल्हा विधी सेवा प्राधिकरचे सचिव ए.जी. संतानी यांनी केले आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबीत असलेले जनता किंवा पक्षकरांचे खटले व न्यायालयामध्ये दाखल न झालेले (दाखलपूर्व) प्रकरणे आपसी तडजोडीने व सामंजस्याने मिटवीण्याकरीता लोक अदालतीसमक्ष ठेवण्यात येणार आहे. न्यायालयीन प्रकरणे आपसी तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्याकरिता नागरिकांना न्यायाधीश, तज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते याचे मंडळ (पॅनल) मदत करणार आहे. विशेष बाब म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेकरिता कोणत्याही प्रकारचे अतिरीक्त शुल्क (फी) भरावी लागणार नाही.
या अनुषंगाने सर्व जनता तसेच पक्षकारांना आवाहन करण्यात येते की, तडजोडप्राप्त प्रलंबित खटले “राष्ट्रीय लोकअदालत” समक्ष आपसी तडजोडीने व सामंजस्याने मिटवीण्याकरिता संबंधीत न्यायालयात अर्ज करावा तसेच दाखलपूर्व प्रकरणांबाबत नजीकच्या संबंधीत जिल्हा किंवा तालुका न्यायालय यांचेकडे संपर्क साधावा व शनिवार, दि. 12 डिसेंबर, 2020 रोजी आयोजित केलेल्या “राष्ट्रीय लोकअदालत” समक्ष आपली प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावतीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. उर्मिला एस. जोशी-फलके आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव ए.जी. संतानी यांनी केले आहे.
Contents
hide
Related Stories
November 22, 2024