वरूड येथे महिलांसाठी १०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय मंजूर
* आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नामुळे हजारो महिलांना मिळणार दिलासा
* आमदार देवेंद्र भुयार यांच्या चार वर्षाच्या लढ्याला यश
गौरव प्रकाशन वरूड (तालुका प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षांपासून वरूड शहरासह तालुक्यातील महिला व बालकांसाठी १०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय स्थापन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून, आरोग्य विभागाकडून त्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून शहरासह ग्रामीण भागातील महिला व मुलांसाठी स्वतंत्र रुग्णालय स्थापन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून, आमदार देवेंद्र भुयार यांनी वरूड येथे स्वतंत्र महिला रुग्णालय मंजूर करून महिलांचे उपचार तालुक्याच्या ठिकाणी व्हावे या उद्देशाने आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी रेटून धरल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विशेष बाब म्हणून वरूड येथे महिलांसाठी १०० खाटांचे रुग्णालय मंजूर करून दिल्यामुळे वरूड मोर्शी तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. वरूड येथे महिला बाल रुग्णालयाला आरोग्य विभागाकडून मंजुरी मिळाली असून तसा शासन निर्णय काढण्यात आल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.
वरूड येथे महिला व बाल रुग्णालय मंजूर व्हावे यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यास यश आले असून, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे.
वरूड येथे सद्यस्थितीत उपजिल्हा रुग्णालय मंजूर आहे. सदर रुग्णालयात वरूड शहर, तालुक्यासह पंचकृषीतून मोठ्याप्रमाणावर महिला रुग्ण येत असतात. त्यामुळे वरूड शहर व तालुक्यातील महिलांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी वरूड शहरात स्वतंत्र महिला व बाल रुग्णालयाची अत्यंत आवश्यकता होती.
यासंदर्भात गेल्या अनेक वर्षातील तत्कालीन आरोग्य मंत्री यांच्या समवेत बैठका घेऊन विशेष पाठपुरावा करून आमदार देवेंद्र भुयार यांनी महिला व बाल रुग्णालयाबाबत शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कडे अनेक वेळा झालेल्या बैठकीत महिला रुग्णालय तातडीने मंजुरी मिळावी, अशी मागणी केली होती. यास शासनाने मान्यता दिल्याने येथे विशेष बाब म्हणून महिला व मुलांचे रुग्णालय स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वरूड येथे १०० खटांचे महिला रुग्णालयाच्या मान्यतेसाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनाकडे यशस्वी पाठपुरावा केल्यामुळे शासनाने वरूड येथील महिला रुग्णालयास विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आहे. यामुळे मोर्शी वरूड मतदारसंघातील महिलांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागनार असून याचा मतदार संघातील महिलांना दिलासा मिळणार आहे. वरूड येथे १०० खटांच्या महिला रुग्णालयास मंजुरी मिळऊन दिल्याबद्दल वरूड मोर्शी तालुक्यातील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.