जल हे माझे जीवन आहे.जलावर प्रेम करणारे सर्व माझे बांधव आहेत.जल म्हणजे अमृत अाहे,अशा अमृतावर माझे प्रेम आहे. परंपरेने पृथ्वीतलावरील प्रत्येक सजिवांसाठी जल हे जीवनमृत्युच्या प्रवासातील संजीवनी आहे असे मानणा~यांचा आणि “पाणी अडवा-पाणी जिरवा” या प्रकल्पाची अमलबजावणी करणा~यांचा मला अभिमान आहे. जलजागृती करण्यात पारंगत होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.
मी जलजागृती करुन जलाबद्दलच्या ज्वलंत समस्या समाजासमोर मांडणा~यांचा ,जलाची नियोजनबध्दता ,जलशुध्दीकरण, जलसंधारण, पुनर्भरण प्रत्यक्षात करून जलदुर्भिक्ष या जलसंकटाची जाणीव करुन जल वाचवून जलसाक्षरतेतून जलजागृती करणा~या शासनाचा आणि नागरिकांचा मान ठेवीन व जलप्रदूषण थांबवणा~यांशी ,पाण्याचा अपव्यय टाळणा~यांशी आणि जलसमृध्दी करणा~या प्रत्येकाशी मी सोेजन्याने वागेन.
जल हे माझे जीवन आणि जलावर प्रेम करणारे माझे बांधव आहेत, त्यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.यापुढेही त्यांचे योगदान जलसंधारणासाठी,जलसमृध्दिसाठी आणि जलजागृतीसाठी सतत मिळत राहो म्हणून त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यातच माझे सोेख्य सामावले आहे.
- प्रतिज्ञाकार:-प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले,
- अमरावती.
- भ्र.ध्व.:-८०८७७४८६०९
- Email ID. arunbundele1@gmail.com