होलीका आज रडत होती .तिला सजवले होते परत परत तिच्यावर जबरदस्ती करणारे क्रुर आजुबाजुला लपलेले होते.तिला पेटत्या ज्वालात ढकलणारे असंख्य हात मोठ्या आनंदाने हसत नाचत नशामध्ये गुंग होऊन येत होते
होलीका तटस्थ होती.तिला विश्वास होता कधीतरी माझ्या पुर्वाजांच्या वंशाना जाग येईल व अपमानास्पद इतिहास पुसून मला सन्मान देतील..माझी पूजा करण्या ऐवजी अंधश्रद्धा रूढी.जातीपातीच्या अन्यायाला दांभिकतेला अपमान कारण गोष्टीला पेटवून देतील अशी आस मनाला लावून महीने साल दर साल शतके युगातंरे वाट बघता बघता ती दरवेळेस दरवर्षी जळतच होती
अवती भोवती तिचा इतिहास जाणणारे कोणीच कसे जीवंत नाही यांची खंत वाटून आगीत भस्म होत होती..
तेव्हा अग्नीच्या ज्वाला म्हणाल्या होलीकाला..
,,होलिका किती शतके किती युग वाट पाहणार आहेस ग .
अंग ,तुझा इतिहास जीवंत असला तरी इथे माणसे जीवंत पाहीजेत ना..तुझ्या इतिहास वाचायला ? अंग.हे माणसे कधी प्रश्न च करत नाही .स्वताःला पुराणाच्या खोट्या नाट्या कल्पनेतच स्वंताःची आहुती देतात म्हणूनच हे युग पेटत आहेत ..नंतरही पेटतच राहणार
खोट्या.गोष्टीला सत्य समजून सत्य शोधण्याचे काम यांचे डोकी करत नाही.. यांची डोकी म्हणजे भट ब्राह्मणाची उत्पादन देणारी शेती होय
खोट्यालाच खरे समजत आहेत अंधश्रद्धा च्या वस्तीतील आहेत मेलेले माणसे?
लोकांनी इतिहास वाचवा असे वाटत नाही त्यांना फक्त रंगवून सांगणार् या कथा आवडतात दैवीकरण , चमत्कार ,अश्या भुताटकी आवडतात लोकांना!
जो खरा इतिहास असतो तोच कोणी वाचत नाही .जो इतिहास वाचतो तो कधी इतिहास विसरू शकत नाही…हे डाँ.बाबासाहेब आंबेडकर सांगतात..
या जगाला एकाच जागतिक विश्वरत्नाने टक्कर दिली म्हणून तुझा खरा इतिहास मी सांगू शकते नाही तर या भारताचे तुकडे तुकडे झाले असते
.माणसाला माणसापासून तोडणारी ही संस्कृती खूप वाईट आहे .
पण माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे हे सांगणारे
असे ते संविधान आहे..मुक्ततेचे..पण त्यावरही सावट आहे…संविधानाला जपणारे लोकच जीवंत नाही.. कुठे कुणाची तू आज वाट बघतेस..होलिका?
लेण्यामधूनच बुध्द नष्ट करून काल्पनिक कथा रंगवून रंग खेळले जातात..
रक्ताच्या चिरकांड्यासोबत रंग पंचमी खेळणारे .व युध्दाची भाषा बोलणारे नव्हे युध्दच करणारे .आपल्याच आप्तेष्टांना मारणारे कसे दयावान होऊ शकतात.
तुझ्या वंशातील बळीराजा याला ही माझ्याच स्वाधीन केले होते.तो इतिहास अजुनही माझ्या उरात धगधग पेटतो जणू
तुझा इतिहास मलाच माहीत आहे.
राजा बळीच्या वडीलांचे नाव होते विरोचन,विरोचन च्या वडीलांचे नाव होते प्रल्हाद तसेच प्रल्हादच्या पित्याचे नाव होते हिरण्यकश्यप ..या हिरण्यकश्यपला एक बहिण होती
! जिसे तूच रूप आहे म्हणजेच होलिका
होलिका ही खुप बहादूर होती.ती युध्दकलेत परागत होती.स्त्रीयांनी युध्दकलेत प्रविण्य मिळविणे हे नाकामी असलेल्या प्रल्हादाला पटले नाही ,पण तोच हिरण्यकश्यपचा मुलगा होता प्रल्हाद हा आळशी,नशापान करणारा होता.अनेकाअनेक वाईट व्यसनांनी तो ग्रस्त होता अतिशय घमेंडी मित्रादोस्तात रममाण होऊन नाचगागे तमास्यात तो जायाचा
म्हणून हिरण्यकश्यप राज्याने त्याला राजमहालातुन हाकलून लावले होते.।पण त्यांच्या आईला हे आवडले नाही. पण राजाची अवज्ञा कोण करेल आणि त्याला कोणत्याही शिपायाने भेटू नये हा दंडक होता म्हणून ..ती चोरून जेवनाचा डब्बा होलिकाच्या हाताने प्रल्हादाला पाठवित होती..
त्या काळी फाल्गुन पौणिमा ही बुध्दकाळापासुनच परिचीत असलेली पौणिमा …होती याच दिवशी बुध्द कपिलवस्तूला आले होते.म्हणून हा जन उत्सव होता..
त्याच दिवशाला नष्ट कसे करायचे हा कट सुरूच होता..याच दिवसाला खंडवावन जाळण्यात आले होते.त्यामध्ये जीवंत जीवंतच लाखो लोक मारल्या गेले
.मी त्यांची साक्ष आहे.
पण इथे पुराणातील देव म्हणविणार्या लोकांनी रक्ताची होळी केली ग.
तेव्हा हा देश नसून मृत संस्कृतीचा वारस वाटत होता..रक्ताची रंगपंचमी हे सतत पाच दिवस खेळले होते.ना अत्याचार करणार् यांना शिक्षा ना कसेलेही सवाल सगळेच नाग लोक मारल्या गेले.बरे झाले असित मुनीनी एक नागवंश आपल्या सोबत नेला आज त्याचीच ही वंशवळ .
होलिका हे सर्व ऐकत होती..परत ती अग्नीला म्हणाली याच दिवशी
फाल्गुन पौणिमेचे महत्त्व त्यांनी नष्ट केल.
होलिका म्हणाली माझ्यावर प्रल्हादाच्या मित्रांनी बलात्कार केला आणि जीवंत जाळले.तेव्हापासून मी जळतच आहे जळतच आहे..
अग्नी शांत होत होती होलिका मात्र जळतच होती.लोक तिच्याभोवती मोठ मोठ्या ने आवाज करत होते..
पण तिचा आवाज बहिर् या मृतप्राय संस्कृतीने हदपार केला होता…
होलिका वाट पाहत आहे नव्या युगाची नव्या प्रतिभेची आज ही तटस्थपणे.. अविरतपणे …
सुनीता इंगळे.