- हरवलेल्या पाखरांच्या आईचे
- चेहरे अजून डबडबलेले
- नाजूक कोमल कांतीला
- आगीने पूर्ण लपटलेले…..
- घडणाऱ्या घटनेनंतर
- यंत्रणा लागली कामाले
- पहिलेचं घेतली असती काळजी
- तर भविष्य नसते जळले…..
- मदतीचे सारे ओघ येऊन
- काय ममतेला न्याय मिळेल.
- आपण पुन्हा विसरू
- आणि असेच पुन्हा घडेल….
- गयवरली सारी नगरी
- मनं सारे भेदरलेले
- अंकुरणाऱ्या जीवांचे
- कसे विसरावे आर्त किंकाळणे..
-संदीप गायकवाड
Contents
hide
- ९६३७३५७४००