हटके दिसायचे तर..!

    आता लवकरच लग्नसराई सुरू होत आहे. त्यादृष्टीने लग्न समारंभात हटके पोषाखाच्या ानवडीबाबत विचार करायला हवा. खरं तर नेहमीच्या जीन्स-टी शर्ट, फॉर्मल्सपेक्षा काही तरी वेगळं ट्राय करायची संधी या निमित्ताने मिळत असते. त्यादृष्टीने तुम्ही बंदगळा हा प्रकार ट्राय करू शकता. हा वेगवेगळ्या पद्धतीने कसा कॅरी करायचा याविषयी..

    थोडा मोकळाढाकळा लूक हवा असेल तर फिटिंगवाल्या ट्राउर्जससोबत बंदगळा कॅरी करा. त्यावर डबल माँक ट्रॅप्स ट्राय करता येतील. हँडवर्कवाला बंदगळा ट्राय करता येईल. ब्लॅक किंवा इतर मॅचिंग ट्राउर्जससोबत तो कॅरी करा.

    सोबत लेदरचे शूज आहेतच. प्लेन कुर्ता पायजमा आणि त्यावर बंदगळा नेहरू ज्ॉकेट असं कॉम्बिनेशन करता येईल. यासोबत माँक स्ट्रॅप्स किंवा मोजडी ट्राय करता येईल. सकाळच्या वेळी गॉगलही घालता येईल. अगदी लांब आकाराचा बंदगळा कॅरी करण्यापेक्षा थोडा शॉर्ट बंदगळा घ्या. सोबत योग्य फिटिंगची जोधपुरी पँट घाला. कॉंट्रास्ट रंगाच्या पॉकेट स्वेअरने आपला लूक खुलवा. हा पेहराव तुम्हाला हटके लूक देईल. बंदगळ्यावर एखादं फॉर्मल ज्ॉकेट आणि फिटिंगवाली ट्राउजर कॅरी करू शकता.

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
YouTube
Pinterest
LinkedIn
Instagram

Leave a comment