सध्या मान्सून सेलचे दिवस आहेत. या दिवसात कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त खरेदी करण्याचा तुमचा मानस असेल. मात्र, कोरोनाचं संकट लक्षात घेता खरेदीसाठी बाहेर पडताना तसंच खरेदी करताना पुरेशी काळजी घेणं गरजेचं आहे. अर्थात, खरेदीमध्ये बजेट, ट्रेंड आणि स्टाईल यांचा त्रिवेणीसंगम साधायला हवा. खरेदी करताना लेटेस्ट ट्रेंड माहिती असणं गरजेचं आहे. या धर्तीवर खसा जपूनही स्टायलिश कसं दिसावं याविषयी.
उत्सवांदरम्यान फ्युजन लूक ट्रेंड जोरात आहे. तो फॉलो करा. एम्ब्रॉयडरी किंवा फ्लोरल पिंट्रच्या स्कर्टवर प्लेन टॉप किंवा क्रॉप टॉप चांगला लूक देईल. या पेहरावाबरोबर योग्य अँक्सेसरीजचा वापर केला तर ट्रेंडी लूक मिळतो. फारशी झकपक न करता ट्रेंडी कॅज्युअल लूक मिळवायचा असेल तर पलाझोबरोबर ट्युनिक टॉप कॅरी करा. पारंपरिक टच देण्यासाठी झुमके किंवा शोल्डर ईअररिंग्ज घालू शकता. क्रॉप टॉपसोबत हेरम किंवा धोती पँट्स घालणं सध्या ट्रेंड्मध्ये आहे. थोडा आधुनिक टच देऊन साडी ड्रेप करा. सिल्क किंवा कांजीवरम साडीसोबत मॅचिंग क्रॉप टॉप घाला. या पेहरावाला ट्रॅडीशनल टच देण्यासाठी तुम्ही भरपूर बांगड्या घालू शकता. अँक्सेसरीजही पारंपरिक धाटणीच्या निवडा.