सावधान, धोका आहे येथे..!

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

चिकनप्रेमींची संख्या बरीच मोठी आहे. ती वाढतंही आहे. मात्र चिकन खरेदी करताना काही दक्षता घ्यायला हवी. जास्त मांस मिळवण्याच्या लालसेपोटी कोंबड्यांना रसायनयुक्त औषधं आणि काही इंजेक्शनचा डोस दिला जातो. ही औषधं त्यांच्या मांसाच्या गुणवत्तेवर प्रभाव टाकतात. म्हणून बॉयलर चिकनपेक्षा देशी अधिक सुरक्षित असते असे तज्ज्ञ सांगतात.
बॉयलर कोंबड्यांच्या कच्च्या मांसात बरेच किटाणू आणि जीवाणू असतात. त्यांना संसर्गाचा मोठा धोका असतो. मांस धुतलं जातं त्यावेळीही जंतूसंसर्ग संभवतो. मांसावाटे आपल्यावरही या संसर्गाचा प्रभाव जाणवतो.
मोठय़ा संख्येने पक्षी कापले जात असताना कोंबड्यांबरोबर काही अन्य पक्ष्यांची कटाई होत असते. त्यावेळी त्या पक्ष्यांमधील बॅक्टेरिया कोंबड्यांच्या शरीरात संसर्ग उत्पन्न करु शकतात. कमीत कमी देखभालीत कोंबड्यांची वाढ व्हावी, त्यांच्या शरीरातील रोगप्रतिरोधशक्ती चांगली राहावी आणि साथीच्या रोगांचा प्रभाव कमी व्हावा या हेतूने बॉयलरमधील कोंबड्यांना अँटी बायोटिक इंजेक्शन दिली जातात. मात्र हा जास्तीचा डोस त्यांच्या मासांमध्ये असे काही गुणधर्म निर्माण करतो जे मानवी शरीरासाठी घातक ठरु शकतात. बॉयलर चिकनमध्ये ६७ टक्के ईकोली बॅक्टेरिया असतात. याच्या संसर्गामुळे मानवी शरीर अनेक रोगांना बळी पडू शकते.

Leave a comment