साडीसाठी परकर खरेदी करताना रंगांची पूर्ण काळजी घ्या. परकर घेताना साडी सोबत न्या. रंग नीट जुळवून मगच परकर खरेदी करा. * योग्य आकाराचा परकर घेतल्यास साडीत उंच आणि सडपातळ दिसणं शक्य होतं. म्हणूनच फटिंगच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका.
* परकर टाचेच्या दोन इंच वर असायला हवा.
* साडीच्या कापडानुसार परकर निवडा. कमी वजनाच्या साडीसोबत थोडा जाड परकर शोभून दिसतो तर जाड कपड्याच्या साडीत पातळ परकर शोभून दिसतो.