सम्राट अशोक : एक श्रेष्ठ तम सम्राट

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram
       इतिहासाच्या पानापानांवर परिच्छेदा च्या परिच्छेदांवर गर्दी करून असणाऱ्या लक्षावछधी राजांच्या नावामध्ये, सम्राट अशोकाचे एकट्याचेच नाव एखाद्या तळपत्या तार् यासारखे चकाचक राहते, अशोकाचे हे वेगळेपण असामान्य आहे, अलैकिक आहे. हेच आपण नेमके समजावून घेतले पाहिजे, कलिंगच्या लढाईनंतर त्याच्या व्यक्ती मत्वात झालेल्या अमूलाग्र बदल हेच त्यांच्या वेगळेपणाचे गमक आहे, शत्रुपक्षाची प्राणहानी, वित्तहानी पाहून सामान्यतः पराक्रमी राजे आपली पाठ थोपटून घेतात, यशाने उन्मत्त होतात, सम्राट अशोक राजा असा सामान्य राजासारखा उन्मत्त झाला नाही, त्याने शांतपणे विचार केला, प्राणहानीने, वित्तहानीने तो व्यथित झाला आणि हिंसेचा मार्ग अवलंबल्याबद्दल त्याला पश्चात्ताप झाला. त्याने हिंसेचा मार्ग सोडला असे हे राजाने वागणे. हेच त्यांच्या असामान्य पणाचे अलैकिक करुणामय होणे होय. म्हणजे मानवी मनाला स्पर्श करून त्यांचे दुख स्वतः सम्राट अशोक स्वतःमध्ये पाहत होता. हेच  असामान्य, अलैकिक असेच होते.
         स्वतःला प्रजेचा सेवक मानणारा राजा प्राचीन काळात काय आधुनिक काळातही विरळच  असतो. अशोकाने आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे वागणारा राजा अशोक सम्राट आहे. मौर्य सम्राट बिंदुसार यांच्या मृत्यू नंतर काही काळातच अशोकाने राज्य आपल्या बौद्धिक आणि लढवय्या बाहुवर स्वंताकडे घेतले. इ.स. पूर्व २७३ मध्ये राजा म्हणून घोषित झाला. तेव्हाच अशोक गादीवर आला. पण काही अर्तगंत कुटुंबातील कहलामुळे राज्यकारभार पुढे ढकलला. काही काळाने. देवानाम् प्रिय प्रियदर्शी अशोक राज्यकारभार प्रत्यक्ष लागला, प्रत्यक्षात राज्यरोहण संभारंभ मात्र काही विलंबाने झाला.
       शेवटी इतिहासाने नमुद केलेला. तो क्षण आलाच या काळात इ.स.पूर्व २६९ला राज्य भिषेक झाला आणि भारतभुमीला न्याय, स्वांतत्र्याचे सलोख्याचे  राज्य मिळाले. सम्राट अशोकाने तब्बल तेहतीस वर्ष भारतावर राज्य केले या तेहतीस वर्षात इतिहासात अमर झालेले महापराक्रमी सम्राटा मध्ये एकमेव अशोक सम्राट अशी नोंद केली तेहतीस वर्ष राज्य करून.अनेक धर्मायांचा आदर केला. प्रजेला मालक म्हणून वागवणारा राजा सम्राट अशोक होय.
       इ.स.पूर्व२३६ मध्ये मृत्यू पावले, या प्राचीन भारताच्या इतिहासात एक लक्षणीय कालखंड म्हणून अशोकाच्या कार्यकाळाचा उल्लेख केला जातो. सम्राट अशोकाच्या स्मृती बौध्दवाड्मयातून जोपासल्या गेल्या, महापरिनिर्वाणसुत्त, दिव्यावदान् सुत्त आणि महावंश या ग्रंथातून सम्राट अशोकाविषयी माहिती मिळते, शिवाय शिलालेखाच्या स्वरूपातल्या विश्वसनीय पुरावाही उपलब्ध होतो, आता पर्यत एकून चौदा प्रचंड शिलालेख, ७ स्तंभलेख आणि दोन लहान शिलालेख सापडले आहेत. या शिलालेखाचे वाचन करून त्यातली खरोष्टी लिपी उलगडण्याचे काम, जेम्स प्रिन्सेस, या पाश्चात्य विद्वानाने केले मास्की आणि गुज्जरच्या शिलालेखावरून हे निर्विवादपणे सिध्द झाले की, या शिलालेखातुन उल्लेखिला गेलेला देवानाम प्रिय प्रियदर्शी राजा सम्राट अशोक होय. अशोकाच्या शिलालेखापैकी कलिंगचा शिलालेख, मास्की आणि रुपनाथ शिलालेख,लौरिया अरराज, मेहरौली हे विशेष उल्लेखनीय ठरावेत असे आहेत.
          बौध्द परंपरेननुसार अशोक सम्राटला शंभर भाऊ बहिण होते. त्यांच्याशी संघर्ष करून अशोकाने राज्य मिळवले, असा तर्क बौध्दग्रंथातुन मिळते. अशोकाच्या शिलालेखातुन तो आपल्या भाऊबहिणीवर जिवापाड प्रेम करतो असा संदर्भ मिळतात. तेव्हा वास्तव हेच असणार की राज्यभिषेक राज्यरोहणाला काही विलंब झाला त्यातुन संघर्ष झाला असावा इतकेच आहे.
       कालाशोक म्हणजे यशस्वी लढाईनंतर विजयीश्री मिळते हे जरी खरे असले तरी सामान्य लोकांना लढाईची भीती वाटत असते. म्हणूनच भारतीय  मानसिकतेतुन कालाशोक असे झाले असेल. विजयश्रीला मिळविण्यासाठी कालाशोकाच्या कथा प्रचलित झाल्या असाव्यात.
कलिंगची लढाई इ.स.पू.२६१ मध्ये झाली राज्यभिषेक  झाल्यानंतर आठव्या वर्षा ही लढाई  झाली अशोकाच्या आयुष्यातील सर्वात दुरगामी परिणाम करणारी घटना कलिंगच्या लढाईच्या स्वरूपात घडली, आजच्या ओरिसा प्रांतातील समुद्र किनारी त्या काळात कलिंग नावाचे राज्य होते, या राज्यातले लोक लढवय्ये होते, खंडप्राय देशावर मौर्याची सत्ता होती, कलिंगदेश नावाचे हे राज्य ही आपण जिंकावे ही महत्त्व कांक्षा सम्राट अशोकाच्या मनात निर्माण झाली. हे राज्य छोटे होते. कुठे अशोक सम्राट आणि कुठे हे अनामिक राज्य कलिंग. पण कलिंगचे सैनिक प्राण प्रणाने लढले. तेवढेच तेथील नागरिक सुध्दा लढले. कलिंगची प्रचंड प्राणहानी, वित्तहाणी झाली  पुर्ण कलिंग उध्दस्त झाले. दीड लाख सैन्य सैनिक युध्दकैदी म्हणून मौर्य सम्राटाने बंदिस्त केले होते. लाखाच्यावर सैनिक मारल्या गेले होते. हा विध्वंस अशोकाच्या १३ व्या शिलालेखात वर्णिलेला आहे. अशोकाच्या आयुष्यातीलच नव्हे तर विश्वासाच्या हदयावर ही लढाई चिरस्मरणीय होती. लढाई म्हटले तर जय पराजय ठरलेलाच विध्वंस वित्तहानी हे ही अटळच असते तसेच कलिंगच्या लढाईत झाले. सामान्यतः शत्रुपक्षाच्या वित्तहाणीमुळे, मनुष्यबळ हानीमुळे विजयी होतात, त्यांचा अहंकार सुखावतो पराक्रमाने छाती फुगुन येते. आणि यशाची नशा चढते. आणखी देश पादाक्रांत करण्याची इच्छा निर्माण होते. वाघाला जशी माणसाच्या रक्ताची चटक लागली की तो शिकार करतो .तसाच पराक्रमी राजा एका विजयानंतर अनेक विजय मिळविण्यासाठी लढतो. पण याला अपवाद ठरले तेच अशोक सम्राट. त्यांना हे युध्द बघून यशाची धुंदी चढली नाही. ते सुखावले नाही. या विध्वंसक परिस्थिती ने लक्षावधी माणसे मारल्या गेली यांचे दुःख त्यांना प्रंचड झाले कलिंगच्या युध्दानंतर लगेच सम्राट अशोक बौध्द भंत्ते उपगुप्त यांच्या संपर्कात आले. उपगुप्ताकडुन त्यांनी बौध्दधम्माची दिक्षा घेतल सशस्त्र युध्द न करण्याचा निश्चय केला. त्यांनी मासांहार वर्ज केला आणि राज्य मध्ये सुध्दा मासांहार बंदी केली, तिसरी धम्मपरिषद इ.स. पूर्व.२४० मध्ये पाटली पुत्र नगरीत सम्राट अशोकाने धम्म परिषद आयोजित केली. धम्मपरिषदेचे अध्यक्ष मोगलीपुत्त तिस्स होते. परिषदेचे अध्यक्ष उपगुप्त होते यांचाही अध्यक्ष म्हणून बौध्द ग्रंथातुन उल्लेख येतो. बौध्दधम्मचा  प्रचार आणि प्रसाराची योजना आखण्यात आली. भारतातील भौगोलिक प्रदेशात तसेच श्रीलंकेत आणि सुवर्णदेशातही धर्मप्रसार कार्य हाती घेतले. यवनदेशी महारक्षित यांनी धम्मप्रसाराचे कार्य हाती घेतले. तर श्रीलंकेस महेंद्र आणि संघमित्रा यांनी भेटी दिल्या. ब्रम्हदेशात सोन आणि उत्तर देशात धम्मप्रचारक पाठविण्यात आले. सिध्दार्थ गौतम बुध्दाच्या पदस्पर्शाने पावन झालेले सर्व ठिकाणी त्यांनी चैत्य निर्माण केले. ८४०००स्तुप त्यांनी बांधले. धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी ठिकठिकाणी शिलालेख कोरले, स्तुपाकडे जाणाऱ्या वाटेने दोन्ही बाजूने झाडे लावली, ठिकठिकाणी पाण्यासाठी विहीरी खोदल्या,  धर्मादाय दवाखाने सुरु केले, आपण प्रजाजनाचे मालक नसुन सेवक आहोत असे शिलालेखावर कोरले. आणि प्रजेच्या मनात असिम राजावर श्रद्धा निर्माण झाली. 
        सम्राट अशोकाच्या शिलालेखातुन त्यांच्या राज्याच्या सिमा लक्षात येतात. काबुल, कंदहार अफगाणिस्तान म्हैसूर, प्रांतापर्यंत राज्य पसरलेले होते. बिहार राजपुताना ,काठेवाड मध्यप्रदेश संपूर्ण भारतभुमीवर सौर्वभौमत्व स्विकारले होते.
      अशोकाचे मुल्यमापन करणारे प्राचीन भारतातील इतिहासलेखन करणाऱ्या सर्व इतिहास कारांनी एकमुखाने सम्राट अशोक जगातील सर्वश्रेष्ठ सम्राट म्हणून गौरविले आहे, एच, जी वेल्स, व्हिन्सेन्टास्मिथ या सारखे पाश्चात्य इतिहास कार सम्राटला असामान्य आणि महापराक्रमी तितकाच सर्वाप्रतिप्रेमभाव राखणारा सम्राट दैदीप्यमान झाला आहे असे ते सांगतात. बौद्ध धम्माइतकाच परधर्मायांचा अभ्यास करणारा आणि परधर्मसहिष्णुता बागळणारा एकमात्र सम्राट अशोक या सारखा दुसरा कोणी झालाच नाही आणि होणार ही नाही.
         अशोकाच्या १२ व्या शिलालेखात धम्म स्पष्ट होतो. या शिलालेख परधर्मसहिष्णुतेचे महत्व प्रतिपादले आहे.भिन्न भिन्न धर्म  कलह टाळण्यासाठी काय करावे कसे सांगितले आहे. सर्व  धर्माचे महत्व ध्यानी घ्यावे. सर्वांनी प्रेमाने वागावे बोलावे. टिंगल टवाळी टाळावी. समविय साधना म्हणजे निरनिराळ्या धर्मातील लोकांनी एकत्र यावे. आपल्या धर्माइतका इतराच्याही धर्माचा अभ्यास आणि आदर करावा. असा राजा न कधी झाला आणि होणार ही नाही.
      इ.स.पूर्वी 236 मध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि एक असामान्य व्यक्ती महत्व काळाच्या पडद्याआड गेले जो पर्यंत अशोकाचा दबदबा होता तो पर्यंत या भारतात जातीय सलोखा होता. त्यांना प्रजेबद्दल अपार प्रेम होते. नंतर च्या काळात आपण इतिहास पाहतो तेव्हा अनेक होऊन गेलेल्या राजावर प्रश्न चिन्हं निर्माण होतात. याला अपवाद एकच ठरला  तो म्हणजे सम्राट अशोक होय. अशोकाच्या कार्यकाळाला सलामच!!
      राज्यव्यवस्था आदर्श होती. नागरिकांना कशाचीही कमी त्यांच्या राज्यात निर्माण झाली नाही.. 
     असे महान सम्राट अशोक होऊन गेले. पराक्रमी अलैकिक सुर्यासारख्या तळपणार् या  सम्राटास  माझे अखंड अभिवादन.
      आत्ताच होऊन गेलेल्या  अशोक जयंतीच्या आपणा  सर्वाना हार्दिक शुभेच्छा..
        आपण सर्व जण अशोकाचा कार्यकाळ जाणत आहात तेव्हा आपण ही अशोकांचे वंशज आहोत. तेव्हा ही कोरोनाची लढाई आपण घरातच राहुन लढु शकतो..जिथे शस्त्र चालत नाही तिथे युक्ती आणि बौद्धिक शक्ती चालवावी लागते..
       आता आपण सर्व भारतीय या कोरोनाच्या संकटातुन लवकर बाहेर पडु. काळजी घ्या. गरम पाण्यात मीठ टाकुन गुळण्या करा, आणि उपवास ठेवु नका, आरोग्य जपा..
तुमच्या आरोग्यास माझ्या शुभेच्छा!!!
*सुनीता* *इंगळे*
*मुर्तिजापूर*
*72 18 69 43 05*

Leave a comment