बदलती जीवनशैली, जगण्याचा अतिउच्च दर्जा, तसेच मनामध्ये असलेला एकमेकांविरुद्ध होणारा गैरसमज हा नुसता विचार बदलवत नाही तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या त्या प्रत्येक माणसाला माणसा पासून दूर नेण्याचा प्रत्यक्ष वां अप्रत्यक्ष रीत्या प्रयत्न करीत असतो. खर तर आज समाजात सगळी कडे विभक्त कुटुंब पद्धती दिसून येते आहे. या पद्धतीचा अवलंब होऊन नात्या मध्ये नुकताच खंड पडत नाही तर त्यामध्ये असलेल्या प्रेमाचा शेवट होतांना दिसतो आहे. मित्रांनो ही खरच खूप दुःखाची बाब आहे खर तर आपला भारत देश हा संस्कृतीने सजलेला आणि एकता निर्माण करणारा देश आहे परंतु आता मात्र या नात्याला नावच खोट वेष्टन लावलेलं दिसतंय.
आज दोन दिवसाचा लग्न करून आलेला मुलगा आपल्या बायको साठी स्वतःच्या जन्मदात्या आई बाबाला वृद्धाश्रमात नेऊन टाकतो, धन संपत्ती साठी भावा भावाचे रक्ताचे नाते तुटताना दिसत आहे, तेवढंच नाही तर इस्टेट मिळवण्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठताना दिसतय. नाते तुटण्याची एकच बाब नसून याला भरपूर कारणे आहेत. खर तर कोणत्याही नात्यामध्ये विश्वास असणे गरजेचे आहे ज्या नात्यात विश्वास असतो ती नाती कुठल्याही परिस्थिती तुटत नाही. नातं हे एक झाडा सारखं असत जसे झाडाला वाढण्यासाठी पाण्याची गरज असते, खतांची गरज असते तसेच कुठलेही नाते टिकवण्यासाठी प्रेम, विश्वास एकमेकांबद्दल आदर असणे गरजेचे असते.
म्हणतात ना पैसे कितीही असो पण माणसा शिवाय त्याला अर्थ नाही, तुमचा बंगला जरी असला तरी त्या बंगल्या मध्ये माणस नसेल, तर ते घर नसून चार टिनाचे नुकतेच मकान आहे.घराला घरपण हे माणसाच्या आयुष्यात असलेल्या किंव्हा त्याने निर्माण केलेल्या नात्यामुळेच येत.जसे फुलला सुगंध असतो आणि ते सुगंधाचा आनंद घेण्यासाठी आपल्याला त्याच्या जवळ जावे लागते त्याच प्रमाणे माणसातले माणूसपण कळायला आपल्याला त्या नात्यामध्ये जावं लागत आणि आपण निर्माण केलेल्या अबोल नात्याला फुलवण्यासाठी विश्वासाचं बीज फुलवून अंकुर निघण्यासाठी स्वार्थ सोडून प्रेमाचं खत टाकावं लागत.
माणूस जगतो तरी कशासाठी ? माणूस हा आपल्या जीवनात मिळालेल्या त्या प्रत्येक क्षणाचा आनंद व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या यशाला कोणीतरी चांगल म्हणावं , चार चौघात आपली व्हा व्हायी व्हावी यासाठी सतत संघर्ष करीत असतो पण हा त्याच्या एकट्याचा संघर्ष नसतो तर त्याच्या मागे उभे असणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीचा संघर्ष असतो. पण एकदा यशोशिखावर पोहचला की तू कोण मी कोण अश्या पद्धतीने नाती क्षणात तोडणारा हा माणूस स्वाभाविक स्वार्थी च असे म्हणायला हरकत नाही.
- नाती का सांभाळावीत
नाती का सांभाळावीत? असा प्रश्न पडणे गैर नाही कारण माणूस हा स्वभावाने स्वार्थी असला तरी त्याला कुठे ना कुठे आपण एकट आहोत याची जाणीव होते, मनातले विचार, दुख ,आनंद, राग व्यक्त करण्यासाठी त्याला पैशाची नाहीतर असलेल्या नात्याची त्या नात्यामध्ये असलेल्या माणसांची त्यांच्या प्रतिक्रियांची आवश्यकता असते. का नसणार? माणसाचा स्वभावच बोलका असतो त्याला वेदना दुःख आनंद व्यक्त करण्यासाठी माणसाचीच म्हणजे त्या नात्यांची गरज असते. म्हणून त्या प्रत्येक त्या प्रत्येक नात्याला जपा जी तुमच्यावर जीवा पाड प्रेम करीत असते. पैशाने कितीही मोठे झाले तरी तुमचा अंत होणारच मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे आणि जेव्हा आपण हे जग सोडतो ना तेव्हा आपल्याला त्या नात्याची गरज असते जे तुम्ही जिवंत असताना निर्माण केलेली आहे.
- -प्रतिक्षा गजानन मांडवकर
- (स्वप्न डोळ्यांतले)
- यवतमाळ
- 8308684865