- जे महत्त्व देतात वेळेला
- ते जीवनात पुढेच जातात
- जे करत नाहीत कदर त्याची
- ते आयुष्यात मागे राहतात
- आयुष्यातल्या आनंदी क्षणाचा
- तो एकमेव साक्षीदार असतो
- कटू, वाईटप्रसंगातही नेहमी
- आपणास जगणं शिकवतो
- भूतकाळातील क्षण परत
- कधीच पुन्हा येत नसतो
- भविष्याची ओढ कशाला
- क्षण आताचा आपला असतो
- पैशाने विकत घेऊ सगळंकाही
- पण वेळेला कोणी घेणार नाही
- गरीब कोण,श्रीमंत कोण असा
- भेदभाव कधीच करीत नाही
- जे ठेवतील जीवनात त्याचे भान
- ध्येय, स्वप्न पूर्ण त्यांचीच होतात
- आपणही करू नियोजन वेळेचे
- ज्यामुळे कित्येकजण घडतात
Contents
hide
- अजय बनसोडे
- मु.दापेगाव
- ता औसा जि लातूर