आज विवाह मोठे थाटामाटात होतांना आपल्याला दिसतात. पुर्वीही होत होते. त्यावेळच्या परिस्थीतीनुसार थाटामाटातच व्हायचे. मग गरीब असो की श्रीमंत.आज विवाहसोहळ्याची पद्धतच बदलली. आजचेह विवाहसोहळे हे कर्ज काढून थाटामाटात होत होत असतात. पुर्वी एवढ्या थाटात विवाहसोहळे होत नव्हते. तसेच त्या विवाहसोहळ्यात परंपरा राबविण्याला जास्त महत्व होते. त्याचप्रमाणे मानक-यालाही महत्व होते. मानकरी अर्थात मधला माणूस.कोणताही सौदा जर करायचा असेल तर ज्याप्रमामे मधला माणूस हवा असतो. ज्याला दलाल म्हणतात. असाच मधला माणूस विवाह जोडणी करतांनाही हवा असतो. ज्याला मानकरी संबोधतात. हा मानकरी पुर्वीही असायचा. आजही आहे.
मानकरी हा विवाह जोडण्याचं काम करायचा. त्यानं विवाह जोडला की त्याला वधू आणि वर……..तो मानकरी ज्याचा असेल, ती मंडळी विवाहात त्याला एक शालजोडी घ्यायचे. अर्थात कपडे घ्यायचे. त्याला काही धान्यही द्यायचे. त्यातच काही लोकं पैसेदेखील. मानक-याची पुष्कळ इज्जत असायची. विवाहाच्या सर्व कार्यक्रमात त्याला विचारलं जायचं. कारण तोच विवाह शेवटास न्यायचा. त्यातच त्या मानक-यांच्या मतानं मुलगी देतांना वधूकडील मंडळी जास्त प्रश्न करीत नसत. समजा एखादा विवाह फसलाच तर मानक-याला वधूपीते दोष देत नसत. कारण मानकरीच नसेल तर विवाह जुळेल कसा असे प्रश्न उपस्थीत होत.
हळूहळू काळ बदलला. त्यानुसार मानक-यांचा सन्मानही कमी झाला. मानक-याची इज्जत फक्त विवाह जोडण्यापुरतीच होवू लागली. ना त्याला कपडे मिळू लागले. ना त्याला पैसे. धान्य तर दूरच राहिलं. साधं प्रेमाचं बोलही त्याच्या वाट्याला येत नाही. आज मानक-यांची इज्जत गटारावरील कच-यागत झाली आहे. ही शोकांतिका आहे. काम झालं की हो तिकडं म्हणत आज वर आणि वधूपीते मानक-यांना वागणूक देत आहेत. मानकरी बिचारा. ते सर्व अपमानाचे मृग गिळून आजही आपलं कर्तव्य आहे असं समजून विवाह जोडण्याचे काम करतो. काय मिळतं त्याला, तर त्याला काहीच मिळत नाही. फक्त एक समाधान मिळतं.
विवाह जोडणे हाही एक सौदा करण्यासारखाच उपक्रम आहे. नातेसंबंधांचा सौदा. पण ज्याप्रमाणे एखाद्या मालाचा सौदा होतो. ज्याप्रमाणे एखाद्या मालमत्तेचा सौदा होतो. त्यात मानक-याला पैसे मिळतात. तसे पैसे यातही हवेत. कारण हाही एक व्यापार आहे. व्यापारात ज्याप्रमाणे फायदा तोटा होतो. त्याप्रमाणे विवाहातही फायदा तोटा होतोच. कधी मुलगी किंवा मुलाकडील परीवार चांगला निघत नाही. तर कधी मुलाकडील परीवार चांगला निघत नाही. असा परीवार चांगला जर निघाला नाही तर त्याचा दोष हा मानक-यावर लावला जातो. ज्या बाबीतील इत्यंभूत माहिती मानक-यांना नसतेच. मानकरी फक्त त्या दोन्ही पक्षाचं भलं कसं होईल याकडेच लक्ष देेत असतो. तसेच तो आपण जोडलेला विवाह पूर्ण काळ टिकावा यासाठी प्रयत्न करतो. पण या विवाह प्रसंगी मानक-यांना कवडीची इज्जत मिळत नाही. मला मिळते का माझ्या कुुत्र्याला अशी अवस्था कधी न पाहिलेल्या वधू आणि वरपीत्यांची होते. त्यातच एखाद्याला तो परीवार आवडल्यास चौकशी न करता मानकरी विवाह तोडून टाकेल अशीच भीती बाळगून अगदी शुल्लक बोलून मानक-यांना रितसर तोडलं जातं. त्याला ना विवाहात बोलवले जात. ना हळदी व साक्षगंधात. मग काय विवाह होतो व त्या दोन परीवारापैकी एक परीवार खराब निघतो. त्यात दोष मानक-यांचा नसतो. शेवटी ते मानक-याकडं जातात. पण मानकरी त्यावर सांगतो की आता मी तुमच्या विवाहात नव्हतो. साक्षगंधातही नव्हतो. हळदीतही नाही. मग मी काय करु. शेवटी त्या परीवारांचा नाईलाज होतो. यात जो मधस्थी असतो. तोच धड बोलत नसल्यानं वा विवाहामध्ये आता तडजोड करीत नसल्यानं विवाहात समेट घडून येत नाही. विवाह तुटतात.
अलिकडे कौटूंबिक न्यायालयातील खटले पाहिले तर असे घटस्फोटाचे खटले चिंतेचे कारण आहे. अशा खटल्याची संख्या वाढत आहे. मधस्थी माणूसच आज नसतो सक्षमपणे समजंवायला. तसं पाहता कोणीच मधातही पडायला तयार नसतो. कारण त्याला पतीपत्नीचं भांंडण समजलं जातं. त्या पतीपत्नींना संसार कसा करायचा हे सांगणारं कुणीच नसतं. त्यांच्या परीवारांनाही समजंविणारं कुणीच नसतं..मानक-यांना त्या लोकांनी केव्हाच हाकललेलं असते. मानकरीही आपला अपमान सहन करु शकत नसल्यानं केव्हाच पळून गेलेला असतो. शेवटी काय, तर कोर्टाच्या केसेस. दर आठवड्यांनी खटल्याच्या तारखेवर हजर होणे. काम धाम सोडून. कारण या लोकांनी मानक-यांचा शाप विकत घेतलेला असतो.
मानक-यांचा आजही मान व्हायलाच हवा. कारण तो दोन परीवार जोडतो. तो जर नसेल तर दोन परीवार एकत्र येवू शकत नाही. त्यांचे नातेसंबंध जुळू शकत नाही. तसेच ज्याला आपण वंशवेल म्हणतो ना. तिही बहरु शकत नाही. त्यादृष्टीनं त्याला महत्व असायलाच हवे. मग तो कोणीही, कोणत्याही जातीचा का असेना. आजचा मानकरी काही पुर्वीसारखे धान्य वा मुद्रा मागत नाही. आजचा मानकरी काही कपडे मागत नाही. तसेच काही खायलाही मागत नाही. तो फक्त मानाचा भुकेला आहे. त्याला मान देण्याची गरज आहे. आज जर या मुद्यावर निरीक्षण केले गेले तर ज्या माणसामुळं दोन परीवार जोडले जातात. त्याची किंमतही आज कमी झालेली असून आपले नाते जुळले रे जुळले तर ते नातेवाईक एकमेकांना म्हणतात की मानक-यांना डोक्यावर बसवू नका. याचाच अर्थ असा की ते पुढील काळात संभाव्य धोक्यांना आमंत्रण देत असतात. ज्या वागण्यातून मोठमोठे धोके निर्माण होत असतात. म्हणून मानक-यांना मानसन्मान द्यायलाच हवा. पुरेसे धान्य वा कपडेही घ्यायला हवेत. जेणेकरुन इतरांचे नातेसंबंधही तो मानकरी हिरीरीने जोडेल व दोन परीवार एकत्र येतील.
- अंकुश शिंगाडे
- नागपुर
- ९३७३३५९४५०