अक्षरापासुन शब्द ,शब्दापासून भाषा यांचा शोध मानवाला लागल्यापासून मानवाने अश्या विस्तृत जनसमुहाच्या सामाजिक जीवनाची धारणा करते तिला भाषा असे म्हटले जाते..
अर्थात भाषा म्हणजे काही शब्दांच संकलन नव्हे .तर काळाच्या भाळावर स्वार होऊन समाजाच्या वैचारीक आणि जाणिवात्मक संचिताला पूढे नेणारी आणि परिवर्तनशील मानवी जीवनाला अखंडता ,आकार आणि आशय प्रदान करणारी एक समर्थ व्यवस्था असते
वाघिणीच दूधहा काव्यसंग्रह समाजाला दिशा देणारा आहे तव्दतच समाजातील समस्यांवर ,आजच्या राजकारणावर झणझणीत अंजन घालणारा आहे
लेखकांनी बालवयापासुनच सामाजिक संघर्ष केला आहे .तसाच लेखकांचा पिंड काव्यत्मक कलाअविष्कार मांडणारा आहे.
राईबाई लेखकांची आई जात्यावर गाणे गात होती .त्यामुळे बालवयात लेखकांना गाण्याची आवड निर्माण झाली .पण गुरू विना शिष्य नाही, या म्हणी नुसार ना,सू ,वसू सरांनी लेखकांचे सुप्त गुण जाणले ,कारण विद्यार्थाचे सुप्त गुण पारखायचे हे शिक्षकाच्या ज्ञानातुन ते विद्यार्थांना पारखत असतात .अशी पारखी नजरच ,वासू , सरांची होती
.जेव्हा .वसू गुरूजीची पारखी नजर लेखकावर पडताच त्यांनी लेखकांना काव्य लिहण्याचे आणि गाण्याचे प्रोत्साहन दिले.तेव्हा जणू दुधात साखरच पडली ,म्हणूनच 14 व्या वर्षा या लेखकांनी भीम गीत तयार केले .आपल्या नवजात संघर्ष
जगण्याने ते गाण्यामध्ये आले….
डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बिद्र वाक्यातून शिका संघटित व्हा संघर्ष करा या वचनाच्या उंचीला पाहण्यासाठी लेखकांनी बालवयातच लेखणी हातात धरली .आणि असीम श्रध्देतुन शब्द अवतरले .त्या गीताचे बोल असे होते की ,बाबासाहेबाचे रूप ठेवून उरात ,गाणे भीमरायाचे गावू सुरात ..अप्रतिम शब्द रूप सुमनातुन त्यांनी आपले त्यांनी आपले जीवन कवितेला अर्पण केले ,
त्याच प्रमाणे लेखकांनी 1962च्या दुष्काळात दिवसभर उन्हात राबराब राबून रात्री विरंगुळा म्हणून आपल्या वस्तीतील भजनी मंडळांत गावू लागले व स्वंःता गाणे रचू लागले लिहू लागले ,आणि त्याच वेळी दहावीचा अभ्यास क्रम संभाळून लेखक हे सर्व करीत होते ,असे हे असताना त्यांनी जीवनाची दाहकता फार जवळून अनुभवली आहे हे नव्याने सांगणेच नको.या दाहकतेतुन ते फिनिक्स पक्षापरी ते सलाखून निघाले आहेत.ही त्यांची गरूड झेप ..मिलिंद काँलेज मधून त्यांना ज्ञानाचे व लेखनाचे पंख लागले शिक्षण हेच वाघिणीचे दूध त्यांनी आत्मसात केले .आणि नागसेनवनाच्या मातीतुन शीघ्रकवीचा जन्म झाला .ज्या मातीतुन डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणांचा बोधीवृक्ष फुलवला त्याच मातीतुन लेखकांच्या विद्रोही काव्याचा फुलोरा फुलू लागला
प्रा,निशांत गुरू सरांची हिंदीवर चांगलीच कमान आहे ,त्यांनी हिदी मध्ये आपल्या रचना तयार केल्या आहेत .त्याचप्रमाणे दोन अंकी नाटक लिहले आहे ..हिंदीमध्ये ..सासोकी कसम ,,,हे दोन अंकी नाटक त्यांनी ते स्वंःता दिग्दर्शीत केले आहे.
वाघिनीच दूध ,हा काव्य संग्रह मनावर परीवर्तन करणारा आहे .वास्तव समाजाचे मांडणारा आहे.वास्तविक दर्शविणारा आहे कविता ही कविता नसून समाजाची दिशा निदर्शाचा होकायंत्र आहे ,मनाच्या गर्द गाभाऱ्यातुन मांडलेला आक्रोश शब्द रूपाने बाहेर पडत आहे.वाघिणीचे दूध .या काव्यसंग्रहाचे रसग्रहण करताना प्रत्येक शब्द हदयाला स्पशून जातो…मी काव्य संग्रह वाचताच त्यांचे रस ग्रहण करणे सुरू केले होते. आणि सरांना तसा निरोपही दिला होता .पण काही घरगुती अडचणी समोर आल्या म्हणुन जरा उशीरा ही समीक्षा येत आहे.
प्रा निशांत गुरूची लेखणीला तलवारीची धार आहे .प्रत्येक कविता अंतर्मुख करणारी आहे ,प्रत्येक कविता संवेदनशील चिंतनशील कवितेचा ग्रंथ आहे..लेखकांनी नाव ही वाघिणीच दूध ठेवले आहे.किती सर्मपक नाव आहे हे…कारण डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिणीच दूध म्हटले आहे .तुमच्या जवळ शिक्षण असेल तर तुम्ही वाघिणीसारखे गुरगुरणारच ..समाजाची झालेली दुर्रदशा पाहवत नाही विषमत्तावाद्यांशी लढायचे म्हटल्यास शिक्षण टाँपचे पाहिजे .त्याच बरोबर आपण समाजाला पर्यायाने देशाला आपल्याला काही द्यायचे असते .ही भावना असणे म्हणजेच चितंनशील ते प्रज्ञावंत होण्याची सक्षम प्रक्रिया आहे समाजाचा आपण एक घटक आहोत ही भावना परखडपणे मांडता यावी या साठी वाघासारखे जगायला शिकले पाहीजे ते शिक्षण म्हणजे वाघिणीच दुध आहे..हेच वाघिणीच दुध लेखकांनी प्राशन केले आहे .त्यामुळे हा चळवळीचा समाजाला दिशा देणारा काव्य संग्रह निर्माण झाला आहे
पहिल्या काव्य पेरणीची पहीली कविता ही
,,मी संविधान बोलत आहे,,ही आहे
जणू संविधानाच आपल्याशी बोलत आहे असे वाटते कारण आजपर्यंत सत्तेपिसासूनी मांडलेली जनतेची पिळवणूक ही संविधानाची पायमल्ली करुनच केली .न्यायलयीन कामकाज ही सत्तापिसासू लोकांनी हातात घेण्याची जी तयारी केली होती किंवा करत आहेत हा अन्याय होत असताना सगळे मुके झाले , तेव्हा संविधानाला बोलल्या शिवाय पर्याय नाही हे हि वास्तविक भाषा लेखकांनी किती सुबक पणे मांडली आहे .वाघिणीचं दूध या काव्यसंग्रहातील एक एक शब्द मनावर प्रश्न निर्माण करतात .विचार करायला भाग पाडतात हीच आजची अवस्था पाहुन म्हटले आहे।..
मी संविधान बोलत आहे
,गुदमरतो श्वास माझा जखमांनी व्याकूळ मी
वरून जिवंत जरी ही मरण अनेकदा पाहीले आहे मी असंख्य वेळी विझूनही
सर्वाचेच सुरक्षा कवच मी.
पण ,मला वाचवा अन्यथा ,माणुसपण चिरायला वैरी संधी शोधत आहे मी भारतीय संविधान बोलत आहे..
आणि समाजाला स्वबळावर लढण्यासाठी तयार करतात त्याच बरोबर समाजाला स्वंताची औकात ओळखायला ही सांगतात
औकात या कवितेत प्रा..निशांत गुरू लिहतात .
आम्ही स्वबळावर आता
लढू लागलो आहे.
अन् दुष्ममनांच्या मनात
जळू लागलो आहे
किती प्रभावशाली लेखणीची धार आहे कविच्या विचाराची
स्वप्न बाबांचे..या मध्ये कवी नी समाजाला आरसा दाखवला आहे .की आपण कोठे आहोत .बाबासाहेबांनी पाहीलेले समाजाचे स्वप्न आपण सत्यात आणतो का
याला कोण जबाबदार आहे.
डाँ.बाबासाहेब आंबेडकर याचे लेकरे असू तर असे का असंघटित समाज होत आहे.दिशाहीन का झालो आहोत म्हणुन आपला आता डी.एन.ए.तपासण्याची वेळ आली आहे..
म्हणुन कवी म्हणतात
,,शाशनकर्ती जमात व्हा
हे स्वप्न बाबांचे आठवा
संविधान वाचवण्यासाठी दिल्लीला
आपला डी.एन.ए.पाठवा..
किती प्ररखळपणे आणि सत्य तेच कवितेत मांडलेले आहे.सरांनी लेखनीची पारदर्शकता प्रा..निशांत गुरूनी कायम ठेवली आहे..पुढे कवी म्हणतात
दिल्लीचे राजे व्हा..
गुलामाना आदत गुलामीची
गुलामीतच त्यांना आनंद आहे
राजा आपला नको तयांना
जोहर करणे छंद आहे..
व्वा किती सत्य आणि वास्तविक आहे.आज जी समाजाची स्थिती पाहता मन पेटून उठल्या शिवाय राहत नाही ,कवीच्या काव्य मध्ये गझलीयत आहे काफिया रदीप आणि अलामत सारखी जमीन कवीने कवितेत
निर्माण केली आहे..
संविधान संकटात आहे ही किती वास्तविक पणे लेखकांनी सांगितले आहे
.शक्ती प्रंचड असुनही
आमच्या मनगटात ..
ती विरघळतेच कशी
वैर् याच्या गोटात .
अश्या एका पेक्षा एक नव्वद कविता आहेत.वाचकांनी हा संग्रह आपल्या कपाटात न ठेवता तो डोक्यात ठेवण्या सारखा आहे
दुसरी पेरणी आहे …एल्गार .ही पेटत्या मशालीच प्रतिक आहे .जेव्हा काही न्याय मांगताना सरकारला एल्गार करावा लागतो अगदी तसेच सोपेच सोंग घेणार् या समाजाला उठविण्यासाठी एल्गार करावा लागतो.
बाबाचे सरदार ..या कवितेत लेखक लिहतात
बाबा तुझ्या लढ्याचे
सरदार बधीर झाले
डावात परकियांच्या
काही वजीर झाले
नागसेनववनाच्या मातीत
काही खंबीर झाले
काही फितूर आणी
काही खंजीर झाले
किती या शब्दाला तलवारीची धार आहे
म्हणूनच आदरनिय वामन दादा कर्डक म्हणतात.
भीमा तुझ्या विचाराचे जर पाचच लोक असते
तुझ्या विचाराचे न्यारेच टोक असते…
पण दुदैवाने ते पाचही लोक पाच वाटेन गेले..
म्हणूनच मनामनात आक्रोश असतो .मनामनात नित्य भांडण चालू असते..
किती भांडू..या कवितेत लेखक लिहतात
माझ्या समाजात केवढा
माजला आकांत आहे
शिकून बंड पुकारणाराच
आज कसा शांत.आहे
आक्रोश माझ्या समाजाचा
समोर आपल्या किती मांडू
पेटविण्या मन आपले
आपल्याशी किती भांडू
…
खरेच किती सत्य ताकदीने मांडल्या गेले आहे.
कारण माणसाच मन दगड झाले आहे
म्हणुनच लेखक दगड या कवितेत काय म्हणतात
दगड …
दगडात आहे का भावना
दिसते का कुणाची संवेदना
पण ..तुम्ही ,दगडाला देव बनविता
अन् माणसाला जाती दंशाने मारता
मंदीराच्या दगडी पायरीवर
तुम्ही माथा टेकवता …
माणुसकीला मात्र
कापणारे कसाई बनता
तुम्ही डोक टेकविता
अश्या दगड झालेल्या मनाचा लढा शिकवून
अशी धार आहे लेखकांच्या लेखनीला
आणि याच लेखनीतुन परत समाजाला सुचवितात की लढा टोळीने ..या कवितेत म्हणतात
शिकारी वाघ एकटा
शिकार बनू शकतो
आता तरी जागा
अन लढा टोळीने ..
दूध पिऊन वाघिणीचं
का जगतोस वाघा
जसे मान झुकवुन
जगावे शेळीने…
असे शहाणपण समाजाला देतात की शत्रुची चाल पाहुन वागा शेळीसारखे जगू नका तर वाघा सारखे जगा कारण तुम्ही वाघिणीच दूध पिणारे आहात.मग कशाला शिकार होता असा निर्वानिनाचा सल्ला देतात..
श्वास घेऊ का ..
या कवितेत लेखक लिहतात
आपल्या सरदाराच्या तलवारीने
गळा आपलाच चिरला जाईल
सत्तेच्या उष्टा तुकड्यासाठी
उरी घाव कोरला जाईल..
म्हणुनच डाँ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षणापेक्षा प्रज्ञा श्रेष्ठ आहे…सरदार जरी असला तरी तो प्रज्ञावान असायला पाहीजे .समाजाचा घात आपल्या नेत्याकडूनच होत आहे असा जाहीर एल्गार लेखक करतात
हातामध्ये हात द्या ..लेखक लिहतात ही कविता
देह झिजविणार-या घटनाकाराने जेव्हा
चवदार तळ्याच पाणि चाखलं
तेव्हा धगधगत्या क्रांतीच रान उठलं
पाणि आसवांचही पेटलं
अन्
वंचितांना माणूसपण भेटलं
असा हा काव्य संग्रह प्रत्येकाच्या घरात पाहिजे
माणसाने माणसापरी वागावे या तथागत भगवान बुध्द यांच्या प्रबुद्ध ज्ञानातुन त्यांनी मानवतेला माणसासारखे वागण्यासाठी सांगितले पण..माणुस तसा वागत नाही यांची खंत लेखकानां आहे
लेखक लिहतात
माणसा रे माणसा
कोण आहेस तू
पशूत देव शोधतो
माणसात पोसले पशू …
मग खरंच सांग माणसा
माणूस आहेस का तू
आणि मशाल कशी असावी
हे सागंताना लेखक लिहतात की
अख्खा विश्वात सर्वोत्तम
बौध्द धम्म नेकीचा
निरोगी धम्म आमचा
तरी रोग आम्हा बेकीचा
कारण एकीत विजय तर बेकीत पराजय असतो
म्हणूनच एकीच मशाल पेटवा असे लेखक सांगतात
दुसर-या पेरणीतील एल्गार ही शेवटची कविता आहे
एकाच संग्रहात पाच पेरण्या केल्या आहेत .
पहीली पेरणी ही आहे संविधान.या मध्ये कविता आहेत
बारा ..दुसरी एल्गार या मध्ये पंधरा आहेत
विद्रोह ही तिसरी पेरणी आहे या मध्ये पंधरा कविता आहेत
पेरणी नं.चार नागसेनवनाची माती
या मध्ये ही पंधरा कविता आहेत.
शेवटची पेरणी आहे वाघिणीचं दूध या पंधरा कविता आहेत .
एकाच पुस्तकात पाच पेरण्या तर मला वाटते
प्रत्येक विषयाचे जर काव्यसंग्रह तयार केला असता तर
प्रत्येक विषय हा सविस्तर माडंता आला असता .प्रत्येक संग्रहाला न्याय मिळाला असता..
तिसरी पेरणी आहे विद्रोह…
विद्रोह हा प्रत्येक मानवी संस्कृतीचा अपरिहार्य भाग असतो .किंबहुना विद्रोहाशिवाय कुठल्याही मानवी संस्कृतीला तिचा विकास साधता यैत नाही ।कारण विद्रोह हा त्या त्या संस्कृतीचा सांकृतिक जीवनात काहीतरी अनैसर्गिक ,अस्वाभाविक असल्याचे सुचवतो .अर्थात चिकित्सा पध्दती ज्या प्रमाणे आजाराचे निदान करण्याचे स्वंताःचे काही निकष निश्चित करीत असते त्या निकषांच्या आधारे रोग असेल ते सांगते तसाच विद्रोह असते .विद्रोह हे सम्यक तत्व आहे
समाज माझा नागवा ,गर्भपात ,,बाबातुम्ही गेल्यावर ,वादविवाद ,जीवन कळू लागल .या कवितेत कवी म्हणतात
आली लेखणी बोटात
विद्रोहाची आग पोटात
रक्त आमचं सळसळू लागलं
तेव्हा जीवन आम्हा कळू लागलं
भारताच्या इतिहासात भारतीय संस्कृतीच्या विकासप्रकियेला गतिमान करणा-या अनेक विद्रोहांना अधोरेखित केले आहे
आपली वस्ती मध्ये लेखक लिहतात
आग रक्तात आमच्या आणि
आकाश चिरणारी शक्ती आहे
रोमरोमात अंगार पेटला
ऊरी क्रांतीची मस्ती आहे
बौद्ध ,जैन ,बसवेश्वरीय ,लिंगायत ,महानुभाव फुलेवाद ,आंबेडकर वाद ही भारतीय संस्कृतीच्या दुस-या मुखवट्याची विद्रोहरूपेच आहेत..
नागसेवनची माती ..पेरणीत लेखक लिहतात
माझ्या या देशात
माझ्या या देशात
दगडालाही भाव आहे
वेगवेगळ्या आकारात
त्यांचे वेगवेगळे नाव आहे
मानवी मनालाही माणुसकी ऐवजी
दगडी देवाचाच भराव आहे
चिमुकल्याच्या कोवळ्या मनालाही
याच संस्काराचा सराव आहे
किती सत्य मांडले आहे..
वाघिणीचा पान्हा या कवितेत निशांत गुरू सांगतात की
वाघिनीचा पान्हा ..
शिक्षण म्हणजे .
दूध आहे वाघिणीचं
जो पेईन हे दूध
बळ येईन वाघाचं
हे दूध आम्ही प्यालो
गुरगुरणारे वाघ झालो
..
डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश शिका .संघर्ष करा ,संघटित व्हा, हा संदेश स्वाभिमानाने बुलंद लेखणीने मांडला आहे
पुस्तकाचे मुखपृष्ठ पेनाच्या निंप मधून शाई चे थेंब पुस्तकात पडत आहेत .पण त्याच बरोबर पेनातून डाँबाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिबिंब दिसत आहे त्या प्रतिबिंबातून त्याची दृष्टी प्रज्ञायम होऊन क्रांतिकारक पणे जगायला शिकवत आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तसे गुरगुरायला शिका हे सुचवित आहे .
शब्दाची छान मांडणी आहे.प्रकाशक हे लेखकांचे अंतरंग असतात ,संपूर्ण पुस्तक हे प्रकाशनाच्या छपाईवर व व्याकरणवर असते ,पुस्तकांचे उज्वलमय प्रतिभा ही प्रकाशनाच्या बुध्दी कौशल्याचे प्रतिबिंब पुस्तकावर दिसत असते .
दुस-या बाजूने सर लेखन करत आहेत .एकाग्रतेने लेखणीचे सामर्थ्य आपल्या लेखणात उतरत आहेत .अन्यायी समाजव्यस्थेविरूध्द सर्व ताकदीनिशी एल्गार करताना लेखणीतून समाजाला काव्यरूपी
प्रबोधन करत आहे असा हा आहे
.मिलींद काँलेज मधून ज्ञान कण वेचून सरांनी जीवन संघर्ष मय बनविले अन् नागसेन वनाच्या भुमीतुन आणलेले क्रांतीकारण उर्जाकणाने अशीच ही लेखणी प्रकाशीत हो आणि त्यांची उत्तराउत्तर नवा काव्यसंग्रह येवो ,असेच वाघिणीचे दूधाला पिऊन गुरगुरायला वाचक तयार हो अश्या शुभेच्छा देते आहे
प्रा.निशांत गुरूच्या कवितेने शेवट करते .
बुध्द फुललेले ,मी वेचियली फुले
ते भीमाला वाहिले ,फुले भीमाला वाहिले
त्या महामानवाने,थोर घटनाकाराने
किती वादळ पेलले ,कैसे वादळ झेलले
फुले भीमाला वाहिले….
वाघिणीचं दूध
*काव्यसंग्रह*
*लेखक *** *प्रा ,निशांत गुरू*
************************
,समिक्षा. *सुनीता इंगळे*
मुर्तिजापूर
72 18 69 43 05