आमदार देवेंद्र भुयार यांचा महावितरण अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयात ठिय्या !
वरुड मोर्शी तालुक्यातील नादुरुस्त रोहित्र, सिंग फेज लाईन चार दिवसात सुरू न झाल्यास महावितरण कार्यालय जाळण्याचा दिला ईशारा !
आमदार देवेंद्र भुयार यांनी महावितरण अधिकाऱ्यांना धरले धारेवर !
वरुड : मोर्शी वरुड तालुक्यामध्ये सतत वीज पुरवठा बंद असल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत आमदार देवेन्द्र भुयार यांनी मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तक्रारी तात्काळ सोडविण्याकरिता थेट महावितरण अधीक्षक अभियंता संजय खाणंदे यांच्या कार्यालयात ठिय्या मांडून चार दिवसात मोर्शी वरुड तालुक्यातील शेकडो नादुरुस्त रोहित्र , सिंगल फेज लाईन सुरू न झाल्यास अधीक्षक अभियंत्यांचे कार्यालय जाळण्याचा ईशारा देण्यात आला.
महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वरुड मोर्शी तालुक्यामध्ये १६ केव्हीचे २५ ट्रान्सफार्मर, ६३ केव्हीचे २० ट्रान्सफार्मर, १०० केव्हीचे ४० ट्रान्सफार्मर, असे एकून ८५ नादुरुस्त ट्रान्सफार्मर बंद अवस्थेत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांनी अधीक्षक अभियंता अमरावती यांना चांगलेच धारेवर धरले. या आधी सुद्धा आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड येथे आढावा बैठक घेऊन मोर्शी वरुड तालुक्यातील नादुरुस्त असलेले ८५ ट्रान्सफार्मर, मोर्शी वरुड तालुक्यातील सर्वच फिडरवरील रात्रीला सिंगल फेज लाईन २५ आक्टोबर पर्यंत सुरू करण्याचे निर्देश दिले होते . महावितरण विभाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व त्यांच्या वेळ काढू धोरणामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे पाहून आमदार देवेंद्र भुयार यांनी थेट अधिकाऱ्यांना जबाबदार धरून झालेल्या नुकसानाची भरपाई वसूल करून त्यांच्यावर कार्यवाही करणार असल्याचा इशारा आमदार देवेंद्र भुयार यांनी महावितरण अधिकाऱ्यांना यावेळी दिला. यावेळी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेन्द्र भुयार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी, युवा जिल्हाप्रमुख स्वाभिमानी शेतकरी संघटना ऋषिकेश राऊत, गोपाल भाकरे, शैलेश ठाकरे, बाबुराव भाकरे, प्रभाकरराव भाकरे, गणेश चौधरी, सागर राऊत, कपिल बीडकर, घनश्याम कळंबे, सचिन मेहरे, अतुल ढोके आदी उपस्थित होते.
महावितरण अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मोर्शी वरुड तालुक्यातील शेकडो ट्रान्स्फफार्मर नादुरुस्त असल्यामुळे मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकाऱ्यांचे मोठ्या प्रमानात नुकसान होत आहे महावितरण विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असून नादुरुस्त डीपी बसविन्याचे काम, वरुड मोर्शी तालुक्यातील सर्वच फिडरवरील शेतातील सिंग फेज ४ दिवसात सुरू करण्याचे निर्देश दिले असून या कामामध्ये हयगय खपवून घेतली जाणार नसून मी शांत आहे म्हणून संथ नाही माझ्या शांत पनाचा फायदा अधिकाऱ्यांनी घेऊ नये अन्यथा याचे वाईट परिणाम भोगावे लागतील — आमदार देवेंद्र भुयार