लूक खुलवायचा तर..

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

दोस्तांनो, फ्लोरल म्हणजे फुलाफुलांच्या डिझाईनचे किंवा पिंट्रचे शर्ट आता मुलांच्या वॉर्डरोबचा भाग होऊ लागले आहेत. उन्हाळ्यात फ्लोरल पिंट्रचे हे शर्ट ताजेपणाची अनुभूती देतात. फ्लोरल्स खूप छान दिसतात. मात्र ते योग्य पद्धतीने कॅरी करणं आवश्यक आहे. आयुष्यात थोडे रंग भरण्यासाठी फ्लोरल शर्ट तुमच्या फॅशनचा भाग व्हायला हवेत. फ्लोरल्समुळे तुमचं व्यक्तिमत्त्व खुलू शकतं. ट्रेंडी फ्लोरल्स कशा पद्धतीने कॅरी करता येतील याविषयी..
प्लेन, चेक्स किंवा स्ट्राईप्सवाले शर्ट घालण्याची सवय असणार्‍या मुलांना फ्लोरल किंवा पिंट्रेड शर्टशी पटकन जुळवून घेता येत नाही. अशा वेळी न्यूट्रल रंगांची निवड करून सेफ गेम खेळता येईल. फ्लोरल पिंट्रवाला बेज रंगाचा कॉटन शर्ट आणि खाक पँट असं कॉम्बिनेशन करा. यासोबत ड्रेस शूज कॅरी करा. ऑफिसमध्ये कॅज्युअल वेअर म्हणून असा पेहराव करता येईल.
फ्लोरल शर्टवर डेनिम ज्ॉकेट घालता येईल. यामुळे तुमचा लूक फार बटबटीत वाटणार नाही. तसंच तुम्ही ट्रेंडीही दिसाल. फ्लोरल शर्ट, डेनिम ज्ॉकेट, ब्लू डेनिम जीन्स आणि स्नीकर्स घालून तुम्ही चित्रपट बघायला जाऊ शकता.
मोठय़ा पिंट्रवाला किंवा गडद रंगाचा फ्लोरल शर्ट आणि फिकट रंगाची पँट हे कॉम्बिनेशन शोभून दिसेल. अशा शर्टसोबत लिननची ऑफ व्हाईट पँट घाला. ग्रीन कॅनव्हास स्नीकर्सनी तुमचा लूक खुलवा. मित्रमंडळींसोबत भटकंती करायला जायचं असेल तर हा पेहराव बेस्ट ठरेल.
जास्त स्टायलिश दिसायचं असेल तर काळ्या टी शर्टवर फ्लोरल पिंट्रचा शर्ट ज्ॉकेटसारखा कॅरी करा. यावेळी ब्राउन ट्राउझर घाला. कॉफी डेटसाठी हा पेहराव अगदी उत्तम आहे.
मोनोक्रोमॅटिक फॅशनही करता येईल. काळ्या फ्लोरल शर्टवर काळी पँट घाला. स्नीकर्सऐवजी काळ्या स्लीप ऑन्सही निवड करा. कॅफे किंवा रेस्टॉरंटमध्ये जाताना हा लूक कॅरी करा.
खास प्रसंगासाठी तयार होतानाही फ्लोरल्स कॅरी करता येतील. फ्लोरल शर्टवर ऑफ व्हाईट ब्लेझर घाला. सोबत ज्यूट कॉटन ट्राउझर असेल तर उत्तमच! फ्लोरल कफलिंक्स, पॉकेट स्क्वेअरने तुमचा लूक खुलवा.

Leave a comment