नामांतर लढ्यांन
आम्हां काय दिलं
हक्क आणि अधिकार
भीम क्रांती
लढण्याचं बळ दिलं …..
अस्मिता स्वाभिमान
संघर्ष
अन्याय अत्याचार
लाथाडून
एकीच बळ दिलं ….
नामांतर लढ्यांन
आम्हाला काय दिलं
आंबेडकर नावाचं
वादळ
जीवंत असल्याचं
गाव दिलं….
नामांतर लढ्यांन
आम्हां काय दिलं
गुलाम होतो व्यवस्थेचे
गुलामीला ठोकरण्या
एकीच बळ दिलं…
नामांतर लढ्यांन आम्हा काय दिलं
माजलेल्या
जातिभेदाला
गडण्याची बळ दिलं.
नामांतर लढ्यांन आम्हा काय दिलं
समस्त बहुजनांना
पाहिजे तस्
सत्तेच ताट दिलं ….
नामांतर लढ्यांन आम्हा
काय दिलं
शिका संघटित होण्याच
फळ दिलं …
नामांतर म्हणजे
क्रांतीचा नारा
जागृतीचा नगारा
माणूस म्हणून
माणुसकीचं
धड दिलं …..
– राजेंद्र क.भटकर
बडनेरा
*********************