- बैलांच्या तोंडचं मुस्कं आता
- आमच्या तोंडाला आलं !
- सत्तेच्या आमीषानं आम्हा
- हळूहळू मुक बणविलं !
- मतदानानंतर मतदारांची
- होतेय मुस्कटदाबी,
- प्रतिनीधीही खेळतात
- मग सत्तेची धाबाधुबी
- हे गुलामीचे मुस्के(मास्क)आम्ही
- किती दिवस बांधणार आहोत ?
- किती दिवस मुस्क्यात आमचे
- मुखवटे लपविणार आहोत ?
- हरवलेल्या आवाजाची फिर्याद
- येथे कुणी मांडणार आहे ?
- की स्वतःच स्वतःच्या मुस्क्या
- आम्ही रोज आवळणार आहे ?
- व्यवस्थेकडून लोकशाहीचा
- घोटला जातोय गळा
- हळूहळू भारत राष्ट्राचा
- येथे सुकतोय मळा
- झाले खाजगीकरण,लीजवर काही
- तरीही म्हणे आम्ही आहोत बे डाग
- सरकारी नोक-या गोठवल्या तरीही
- आमच्या बुडाला लागत नाही आग
- किती दिवस मुस्क्यांची आता
- सवय करून घेणार आहोत?
- फुले,शाहू,आंबेडकरांची क्रांती काय
- अशीच वाया जाऊ देणार आहोत?
- हे मुस्के झुगारले नाहीत तर
- माणूस म्हणून जगू देणार नाही
- जागे व्हा बहुजनांनो आतातरी
- नाहीतर व्यवस्था सोडणार नाही
- -अरुण विघ्ने
- (चित्र : चित्रकार अरविंद शेलार यांचे)
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
Contents
hide
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–