अहमदाबाद : भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध शनिवारीला नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा पाचव टी-२0सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्यासाठी उतरेल.
भारताला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता तर दुसर्या सामन्यात त्यांनी इंग्लंडवर मात केली होती. तिसरा सामना जिंकून इंग्लंडने आघाडी घेतली तर चौथा सामना जिंकून भारताने मालिकेत २-२ ने बरोबरी केली होती.
मालिकेत पहिले तिन सामने लक्ष्याचा पाठला करणार्या संघाने जिंकले होते. परंतु चौथ्या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना जिंकला आणि इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने अर्धशतकीय खेळी केली होती. भारताने या मालिकेत दोन सामने जिंकले यामध्ये मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांचे मोठे योगदान होते. ईशान किशनने दुसर्या सामन्यात चांगली फलंदाजी करून महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. चौथ्या टी-२0 ची खेळपट्टी तिसर्या सामन्याच्या तुलनेत संथ होती आणि पाचवा तसेच शेवटचा सामन्यातील खेळपट्टीही अशीच असण्याची शक्यता आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने चौथ्या सामन्यातील खेळपट्टीची प्रशंसा केली होती.
भारताने दोन सामने जिंकले होते यामध्ये वेगवान गोलंदाजांची महत्त्वाची भूमिका होती. भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या व शादरुल ठाकूरविरुद्ध इंग्लंडच्या फलंदाजांना धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला होता.
दुसर्या टी-२0 मध्ये भारताच्या वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडला मोठी धावसंख्या करू दिली नव्हते तसेच चौथ्या टी-२0 मध्ये जेंव्हा बेन स्टोक्स मोठे फटके खेळत होता तेंव्हा वेगवान गोलंदाजांनी भारताची पुन्हा सामन्यात वापसी करून दिली होती.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024