भारतीय कामगार चळवळ…

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

    भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले.यांचे एक हुशार, निष्ठावान, तरुण तडफदार, कर्तृत्ववान सहकारी, दीनबंधू पत्र यशस्वी, समर्थपणे चालवणारे, संपादक, झुंजार पत्रकार, स्वतःच्या जीवनातील सुखाची पर्वा न करता, कामगारांसाठी झिजणारे, कामगार चळवळीचे आद्य प्रवर्तक नारायण मेघाजी लोखंडे.१९ व्या शतकात प्रथम सुरू झालेल्या भारतातील कामगार चळवळीचे आद्य प्रवर्तक नारायण मेघाजी लोखंडे. मुंब‌ईतील मांडवी भागात नारायण लोखंडे हे एका कापड गिरणी मध्ये भांडारपाल म्हणून काम करत होते. तिथे त्यांना १३ – १४ तास काम करावं लागत होतं. काम करत तेथील दहशतीला कंटाळून त्यांनी कापड गिरणीतील नोकरी सोडून दिली.आणि स्वतःस कामगार चळवळीत वाहुन घेतले. २३ सप्टेंबर १८८४ रोजी ‘ बाॅबे मिल हॅंडस् असोशिएशन् ‘ ही‌ गिरणी कामगार संघटना स्थापन केली. आणि येथुनच खऱ्या अर्थाने भारतीय कामगार चळवळीस सुरुवात झाली.

    कोणतीही चळवळ ही एका अर्थिक, सामाजिक, राजकीय, परिस्थितीला समाजाने किंवा त्यातील एखादा विभागाने दिलेला प्रतिसाद असतो.मग त्यामध्ये मुंबई गेट सभा, बंद सभा, मोर्चे, लाठीमार, गोळीबार,कलापथके, अभ्यासवर्ग व त्यांचे प्रखर ध्येयवादी डाव राजकीय नेतृत्व अशा स्वरुपातुननच २१ व्या शतकातील कामगार चळवळीची प्रतिमा आपल्या सर्वांच्या मनावर अशीही कोरली गेली आहे. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस रशियात कामगार वर्गाच्या सत्तेसाठी क्रांती झाली होती.दोन महायुद्धांच्या दरम्यान सर्व वैचारिक पातळीवर देखील भांडवलशाहीला मोठेच आव्हान देण्यात आले होते.याच पार्श्वभूमीवर,कॅम्युनिष्ट , समाजवादी, गांधीवादी लोक हे ध्येयवादाने प्रेरित होऊन मध्यमवर्गातील शेकडो तरुणांनी आपले आयुष्य पणाला लावले होते. याच प्रक्रियेत घडलेली देशातील पहिली मुंबई ‌कामगार चळवळ होती.या काळाचा विचार केल्याशिवाय आजची कामगार चळवळ समजणे अशक्य आहे.

    १९५० ते १९७३ पर्यंत देशातील भांडवलशाहीला मोठे जीवदान मिळाले होते. पण ? आता हिच भांडवलशाही एका नव्या रुपात समोर आली होती. सरकारच्या मोठ्या हे हस्ताक्षेपावर आधारित कल्याणकारी राज्य या नावाने भांडवल शाहीचा नवा आविष्कार झाला होता.१९६० ते १९८० या काळात सार्वजनिक क्षेत्रातील कारखानदारी क्षेत्राचा विकास मोठ्या प्रमाणात होत गेला. आणि कारखान्यातील कामगार चळवळीला एक खुप मोठं उधान आलं होतं. त्यामुळे कामगार चळवळ ही अधिक आक्रमक झाली होती.

    मुंबईची कामगार चळवळ ही नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुरू केली. पण‌,त्यानंतरही कामगार चळवळीचं नेतृत्व हे ना.म.जोशी, डांगे,मिरजकर, परुळेकर, रणदिवे यांच्या पासुन ते दत्ता सामंत यांसारख्या मराठी माणसांकडे कामगार चळवळीचं नेतृत्व राहिले आहे. महाराष्ट्राचा विचार केला.तर, सुरुवातीला भांडवलदार उद्योगांच्या डोक्यात मराठी भाषिक राज्यातील मुंबई मध्ये सरकार वर भांडवल दरांपेक्षा, कामगार, शेतकरी, समाजवादी विचार‌ अधिक प्रभावित राहिल अशी अडगळ होती. कारण त्या लढ्याचे नेते होते. काॅम्रेड अमृत डांगे,एस्.एम.जोशी,आचार्य प्र.के.अत्रे,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,शाहीर अमर शेख.यांसारख्यांनी आवाज उठवला.तो मुंबई संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. या संयुक्त महाराष्ट्र लढ्यात संपूर्ण कामगार वर्गांनी लढा दिला.या लढ्याचे नेतृत्व शेतकरी, कामगार मराठी माणसांने आनंदाने स्विकारले.आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा देवुन त्या नवनिर्मित महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश चढवला. यामध्ये गिरणी कामगार, शेतकरी,कलावंत,शाहीरांचं सर्वात मोठं योगदान ठरलं आहे. यांची प्रेरणा होती, ती नारायण मेघाजी लोखंडे. हे आपण विसरता कामा नये.

    १९८० नंतर कारखान्यातील व्यवस्थापकांनी कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन कारखान्यांमध्ये हजारो हंगामी कामगार हे कंत्राटी कामगार म्हणून नेमण्यास सुरुवात केली. आणि एकाच ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांमध्ये सरळ- सरळ दोन स्तर तयार झाले.त्यामुळे अर्थातच आज कामगार चळवळीची कोंडी झालेली दिसत आहे. सध्याची कामगार चळवळ ज्या सभासदांच्या जोरावर उभी आहे. त्या कामगारांच्या कामाला, निदान समान वेतन तरी मिळाले पाहिजे. आरोग्य आणि सुरक्षा तर लांबच राहिली.’समान कामाला,समान वेतन’ या भुमिकेवर येवुन त्यासाठी संप होत नाही, तो पर्यंत कायम कामगारांच्या छोट्या गटांपुरत्या मर्यादित असलेल्या कामगार संघटनांना काहीही भवितव्य राहणार नाही.असं वाटतं. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सहकार क्षेत्राचा विकास होत गेला. आणि त्यामधुन महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साखर कारखान्यांची निर्मिती झाली.तस तसा सहकार क्षेत्राचा पाया मजबूत होत गेला.तसे सहकार क्षेत्र वाढत गेले. सहकार तत्वावर चालणाऱ्या साखर कारखान्यांचा अधिक विकास झाला.तस तशा सहकार चळवळी ह्या विस्तारित गेल्या.पण,याच काळामध्ये कामगार चळवळी ह्या हव्या तितक्या विस्तारल्या नाहीत. मात्र, महाराष्ट्र निर्मिती नंतरही मुंबई हे आजही कामगार चळवळीचे केंद्र बनले.

    ‘कामगार एकजुटीचा विजय असो’ !
    – प्रविण खोलंबे.
    मो. ८३२९१६४९६१.

Leave a comment