प्रतिदिन रोगमुक्त होणाऱ्यांचे प्रमाण रोज नोंदल्या जाणाऱ्या नवीन बाधीतांपेक्षा जास्त
Mumbai(PIB): भारतात आता सक्रीय कोविड रुग्णांची संख्या 5 लाखांपेक्षा कमी झाली असून आजची सक्रीय कोविड रुग्ण संख्या 4,35,603 इतकी आहे. सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांची संख्या एकूण कोविड बाधित रुग्णांच्या 4.60 % इतकी कमी झाली आहे.
प्रतिदिन रोगमुक्त होणाऱ्यांचे प्रमाण सतत वाढत असल्यामुळे एकूण सक्रीय कोविड रुग्णसंख्येत खात्रीशीर आणि लक्षणीय घट दिसून येत आहे.
गेल्या चोवीस तासांच्या कालावधीत देशभरात नव्याने 31,118 व्यक्ती कोविड बाधित झाल्याची नोंद झाली.
केरळ, दिल्ली, कर्नाटक तसेच छत्तिसगढ यासारख्या काही राज्यांमध्ये गेल्या चोवीस तासांत सक्रीय रुग्णसंख्येत घट झाली असली तरी उत्तराखंड,गुजरात,आसाम आणि गोवा यासह इतर काही राज्यांमध्ये या कालावधीत नोंदल्या गेलेल्या सक्रीय रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून आली.
गेल्या चोवीस तासांत 31,118 नव्या कोविड बाधितांची नोंद झाली असली तरी कोविड मधून बरे झालेल्यांची संख्या त्यापेक्षा जास्त म्हणजे 41,985 इतकी आहे.
सद्यस्थितीला, कोविड संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 88,89,585 इतकी असून रोगमुक्तीचा दर 93.94% झाला आहे. उपचारानंतर बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रुग्ण यांच्या संख्येतील तफावत सतत वाढत असून सध्या ही तफावत 84,53,982 इतकी आहे.
नव्याने रोगमुक्त झालेल्या कोविड बाधितांपैकी 76.82% रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील आहेत.
केरळमध्ये एका दिवसांत रोगमुक्त झालेल्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे 6,055 इतकी असून त्याखालोखाल दिल्लीत 5,824 नव्या रोगमुक्तांची नोंद झाली आहे.
नोंद झालेल्या नव्या कोविड बाधितांपैकी 77.79% रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत सर्वात जास्त म्हणजे 3,837 व्यक्ती नव्याने कोविड बाधित झाल्याची नोंद झाली, दिल्लीमध्ये काल दिवसभरात 3,726 तर त्याखालोखाल केरळमध्ये 3,382 नव्या रुग्णांची नोंद झाली.
देशभरात गेल्या 24 तासांत कोविडमुळे 482 रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी 81.12% रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील होते. या काळात, एकूण मृत्यू पावलेल्यांपैकी 22.4% म्हणजे 108 रुग्ण दिल्लीमधील होते तर महाराष्ट्रात 80 आणि पश्चिम बंगालमध्ये 48 जण मृत्युमुखी पडले.
Contents
hide
Related Stories
November 22, 2024