प्रश्नांची मातृभाषा’.. या कवितासंग्रहातील सगळ्याच कविता ताकतीच्या आहेत. ही ताकद पुरवणारे स्रोत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत आहेत. त्यांच्या विचारातून परिपक्व झालेला हा कवी या सर्व कवितेच्या माध्यमातून प्रश्नांची भूमी उभी करतो आहे. त्यावर उत्तरेही शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणून बाबासाहेबांना या कविता संग्रहामध्ये त्यांनी ‘शिखर- पुरुष’ म्हटलेले आहे. विज्ञानमातृक बुद्ध ही सांगितला आहे.
कवी इथल्या जहरी क्षितिजावर उभा असून वास्तवाच्या सागराला, त्याच्या प्रत्येक हालचालीला, प्रश्नवाचक संवादाने, उरातल्या पेटलेल्या आगीने, आपल्याला आलेल्या अनुभूती, जाणीवेतून, जागृत असलेल्या संवेदना घेऊन, दुष्काळग्रस्त प्रदेशातून, आपल्या सहचरी ला प्रमाण साक्षी सोबत घेऊन, जीवनाचे यथार्थ मूल्य जपण्यासाठी, इथल्या हटवादी, भारतमातेचे कुपुत्र, यांचा चेहरा आपल्या कवितेतून उघड करीत, आपल्या आतड्यातली भूक जाळून, त्याच्या आक्रोशाने पेटलेली आग घेऊन, आपल्यावर झालेल्या अत्याचाराचे इतिवृत्त, उभ्या जगाला “प्रश्नांची मातृभाषा’ या काव्यसंग्रहातून सांगत सुटला आहे.या प्रवासाचे साक्षीदार तुम्ही-आम्ही आहोतच. त्यांच्या प्रवासाच्या इच्छित प्रयोजनासाठी त्यांना अनंत कोटी शुभेच्छा देऊयात.. !
पुढील आयुष्याच्या सुबत्तेसाठी शुभकामना व्यक्त करूयात…!
- -प्रा. नंदू वानखडे,
- मुंगळा
- जि. वाशिम
- 9423650468