- नको अंगाले, पोटाले
- फाटक,उपाशी राहू
- तू आमच्या साठी जग
- बा तू फाशी नको घेऊ !!
- गारगोंड महापूर
- तुह्या पांचीले पुंजल
- दुष्काय नशिबी सदा
- सटवाईन लीवलं !!
- नापिकी झाली म्हणून
- तू खचून नको जाऊ
- तू आमच्या साठी जग
- बा तू फाशी नको घेऊ !!
- काय म्हशीच्या शिंगोट्या
- असती म्हशीले भारी ?
- सांग संसाराचं ओझं
- काहून वाटते भारी ?
- बा कर्जाच्या डोंगराले
- तू बिल्कुल नको भिऊ
- तू आमच्या साठी जग
- बा तू फाशी नको घेऊ !!
- येते अस्मानी संकट
- होती पशु पक्षी बेघर
- म्हणत नाही कोणाले
- भाऊ बांधून द्या घर !!
- अस्मानी संकटाले तू
- घाबरून नको जाऊ
- तू आमच्या साठी जग
- बा तू फाशी नको घेऊ !!
- सुलतानी भिकेवर
- तू मौताद नको राहू
- आता देव,दैवावर
- तू भरोसा नको ठेऊ !!
- तुह्या शिवाय बा आम्ही
- कसं जगू कसं राहू
- तू आमच्या साठी जग
- बा तू फाशी नको घेऊ !!
- -वासुदेव महादेवराव खोपडे
- सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
- अकोला 9923488556
- (Images Credit : Lokmat)