सहा डिसेंबर १९५६ सकाळी नेहमीप्रमाणं लोकांनी वर्तमानपत्र पाहिलं.त्यात एक बातमी झळकली.अस्पृश्यांचा नेता काळाच्या पडद्याआड.खरं तर चवदार तळ्याचा जेव्हा सत्याग्रह झाला.तेव्हा ज्या ज्या वृत्तपत्रांनी बाबासाहेबांच्या चवदार तळ्याच्या आंदोलनाला विरोध केला.त्या केशरी आणि मराठा या वृतिचपत्रांनीही वृत्ताची दखल घेत आपल्या पहिल्याच पानावर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची बातमी झळकवली होती.
डाँ बाबासाहेब एक झंजावातच होते.नव्हे तर एक चळवळ.त्या बाबासाहेबांनी कित्येक आंदोलनं करीत आपल्या अस्पृश्य जातींना त्या विटाळाच्या काळ्या बुरख्यातुन बाहेर काढले होते.दलितांना न्याय मिळवुन दिला होता.त्यापुर्वी कोणी त्या गोष्टींना परंपरा समजत होते तर कोणी त्याच गोष्टीला देवाची लीला……खरंच अस्पृश्यांना त्यांच्या हक्कापासुन वंचित करणे याला देवाची लीला कसे म्हणता येईल?तरीही उच्चवर्णीयांच्या गोटातील काही मंडळी म्हणत होती की आमच्या पुर्वजांनी यांच्या विरोधात नियम बनवले.कशासाठी?तर काही तरी प्राब्लेम असेल म्हणुन ना.खरंच बाबासाहेबांनी चवदार तळ्याचं पाणी बाटवलं.त्यामुळे देवाचा खुप मोठा प्रकोप होणार.पण झाले काहीच नाही.
चवदार तळं ज्यावेळी बाटवलं गेलं असा समज करुन घेणा-या मंडळींनी चवदार तळ्याचं शुद्धीकरण केलं.शुद्धीकरणात गोमुत्र,शेण,यासह दुध, दही,तुप हेही वापरण्यात आलं.ज्या शेणात आणि मुत्रात धनुर्वात व विषमज्वर पटकीचे जंतु होते.त्या जंतुयूक्त वस्तु पाण्याच्या शुद्धीकरणाला चालत होत्या आणि दलिताचा स्पर्श…….साधा स्पर्शही चालत नव्हता.हा विटाळ होत होता आणि ती विटाळाची भाषा त्या मनुस्मृतीत लिहिली होती.म्हणुनच बापुराव सहस्रबुद्धेच्या अध्यक्षतेखाली एक एक मनुस्मृतीचा पान वाचुन निषेध करण्यात आला आणि जाळण्यातही आला.कारण समाज मनुस्मृतीनुसार वागत होता.चालत होता.या मनुस्मृतीने स्रीयांनाही छळले नव्हते.म्हणुनच ज्या मनुस्मृतीनुसार आमचाही समाज वागतो.हे वागणे बरोबर नाही हे समजुन घेणारा बापुराव सहस्रबुद्धे हा ब्राम्हणच होता.तरीही त्यांनी मनुस्मृतीला विरोध करीत हा ग्रंथ सर्वांसमक्ष जाळला.आपण जर बाबासाहेबांच्या बाजुला किंवा दलितांच्या बाजुला जर उभे राहिलो नाही तर एकटे बाबासाहेब हा अन्याय दूर करायला पुरु शकणार नाही हे ओळखुन बाबासाहेबांना साथ देण्यासाठी बापुसाहेबच नाही तर काही इतर समाजातील माणसांनीही मित्रत्वाच्या नात्यानं बाबासाहेबांना मदतच केली.पण आज मात्र चित्र असं दिसतं की आपलीच माणसं आपल्याच समाजाला दगा देत आहेत.नव्हे तर समाजाचा वापर करुन राजकारण करीत आहेत.फक्त आपला स्वार्थ पाहात आहेत नव्हे तर साधत आहेत.
ज्यावेळी बाबासाहेब निवर्तले.त्यावेळी करोडो अस्पृश्य जनता शोकसागरात बुडाली होती.शेकडो स्रियांनी टाहो फोडला होता.शेकडो माणसं रडत होती.एक आशेचा किरण आज काळाच्या पडद्याआड झाला होता.अस्पृश्यच नाही तर जे बाबासाहेबांचे विरोधक होते,तेही रडतच होते.हळहळ,दुःख ,वेदना व्यक्त करीत होते.त्यांना जेव्हा चैत्यभुमीवर नेण्यात आलं तेव्हा मुंबईत खुप गर्दी होती.मिळेल त्या वाहनाने बाबासाहेबांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लोकं मुंबईला रवाना झाली होती.मुंबईत आजही लोकं सांगतात की एक बाबासाहेब आंबेडकर व दुसरे बाळासाहेब ठाकरे या दोघांच्याच मृत्यूवेळी एवढी प्रचंड गर्दी पाहिली.बाकीच्या नेत्यांच्या वेळी एवढी गर्दी दिसली नाही.खरंच बाबासाहेब महानच होते.त्यांनी केवळ दलितांनाच विटाळातुन बाहेर काढले नाही तर त्यांनी इतरही समाजाला त्यातुन बाहेर काढले.तथाकथीत समाजाने त्यावेळी बाबासाहेबांना साथ देणा-या बापुसाहेबांसह इतरही ओबीसी किंवा इतर समाजातील लोकांना वाळीत टाकले.पण त्यांनी आपल्या वाळीत टाकणेपणाची किंवा त्रासाची पर्वा केली नाही.ह्याच गोष्टीतुन आपण काय बोध घ्यावा.
आज समाज सुधारला.प्रत्येकाला आपले स्वतंत्र्य जीवन जगता येते.कोणाला कोणती बंदी नाही.कोणाला कोणताच विटाळ होत नाही.पण तरीही काही ठिकाणी आजही भेदभाव आहे.दलितांना शेतीत प्रवेश मिळत नाही.मजुरी करायला दलित शेतात आला नाही म्हणुन मारहाण होते.दलितांच्या मुलीवर जाणुनबुजूव बलत्कार होतात.दलितांनी घरे बांधु नये, म्हणुन निर्बंध लावले जातात.दलित घोड्यावर बसु नये.दलिताने हे करावे,ते करु नये हे संगळं.काही ठिकाणी सारं बरं आहे.मात्र काही ठिकाणी आजही हे सर्रास सुरु आहे.खरंच ही विचार करायला लावणारी बाब आहे.
आज संविधान बनलं.देश स्वतंत्र्य झाला.देशातुन विटाळाचं उच्चाटन झालं.तरीही अशा प्रकारच्या घटना देशात घडणं बरोबर नाही.तिही आपल्यासारखीच माणसंच आहेत.असं समजुन प्रत्येकांनी वागण्याची आज गरज आहे.खरंच बाबासाहेब जे करु शकले, ते आपण करु शकत नाही.ते एक झंजावातच होते नव्हे तर चळवळ असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
- -अंकुश शिंगाडे
- नागपुर
- ९३७३३५९४५०