Contents
hide
- सारवलेल्या भुईवरती, पोरं दाटीवाटीने बसायची
- बाबा म्हणतात आमच्यावेळी,शाळा अशीच असायची
- लाकडी फळा लाकडी टेबल
- लाकडीच असायची खुर्ची
- विषय असायचे खूप सारे
- शिकवायला एकटेच गुरुजी
- काळ्या फळ्यावर पांढरी अक्षरे,छान उठून दिसायची
- बाबा म्हणतात आमच्यावेळी,शाळा अशीच असायची
- सफेद सदरा खाकी चड्डी
- शाळेचा गणवेश ठरलेला
- फाटकी चड्डी वरचा सदरा
- असायचा थोडासा विरलेला
- गळकी चड्डी सावरायला,पिळकावणी घट्ट बसायची
- बाबा म्हणतात आमच्यावेळी, शाळा अशीच असायची
- गुरुजी सांगायचे छान गोष्टी
- गोड गळ्याने कविता गायचे
- कित्ता त्यांचा गिरवताना
- अक्षर आमचे मोती व्हायचे
- अभ्यास नाही केला तर, छमछम छडी दिसायची
- बाबा म्हणतात आमच्यावेळी,शाळा अशीच असायची
- जेवणाच्या सुट्टीत सगळेच
- जेवायला घरी जायचे
- टोपल्यामधली भाकरी घेऊन
- कालवणात चुरून खायचे
- दूधभात खाऊन पोरं, पहिलवानासारखी दिसायची
- बाबा म्हणतात आमच्यावेळी शाळा अशीच असायची
- कबड्डी लंगडी खोखो
- दुपारी खेळ रंगायचे
- शेवटच्या तासाला गुरुजी
- पर्वचा म्हणायला सांगायचे
- पाठांतराच्या सुरात मग,शाळा चिंब भिजायची
- बाबा म्हणतात आमच्यावेळी,शाळा अशीच असायची
- -उत्तम सदाकाळ
- शिवजन्मभूमी,जुन्नर
- 9011016655