बच्चू कडूंच्या बेलोरा गावात भाजपाचे आंदोलन
बच्चू कडूंच्या दूटप्पी शेतकरी भूमिकेचा निषेध
अमरावती : प्रहारचे संस्थापक व महाराष्ट्राचे मंत्री बच्चू कडू यांच्या बेगडी शेतकरी भूमिकेचा निषेध त्यांच्या मूळ बेलोरा गावात जाऊन भाजपाने केला.शेकडो भाजपा कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी पोलिसांनी केल्याने भाजपाचे कर्तकर्ते संतप्त झाले. भाजपाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांच्या नेतृत्वात आज सकाळी चांदुर बाजार येथे भाजपा कार्यकर्ते एकत्र होऊन तेथून बच्चू कडू यांच्या मूळ बेलोरा गावात कार्यकर्त्यांनी बच्चू कडू व महाविकास आघाडी शासनाच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध करून महाविकास आघाडी सरकार मुर्दाबादच्या घोषण दिल्या. भाजपाने अंमलात आणलेल्या कृषी कायद्याची मुहूर्तमेढ ही काँग्रेस युपीएच्या कार्यकाळात रोवल्या गेली तरी सुद्धा आज बच्चू कडू यांना पुढे करून महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण करीत आहे.बच्चू कडू हे जलसंपदा राज्यमंत्री असतांना त्यांच्या घराजवळील वासनी बुजरूक,सोमठाणा सिंचन प्रकल्प त्यांना सुरू करता आला नाही,अनेक सिंचन प्रकल्पावर भाजपा सरकारने निधीची तरतूद केली असतांनाही प्रकल्प एक वर्षांपासून पूर्ण करता आले नाही.महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना प्रचंड यातना देत असतांना याविरुद्ध बच्चू कडू बोलले नाही.तरी सुद्धा केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे प्रसिद्धी मिळते म्हणून बच्चू कडू दिल्लीला आंदोलन करण्यासाठी निघाले आहे अशी टीका भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी यावेळी केली. बच्चू कडू यांनी सर्वप्रथम आपल्या मतदारसंघात लक्ष घालावे ,उद्धव ठाकरे म्हणतात म्हणून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करू नये असा सल्ला सुद्धा निवेदिता चौधरी यांनी दिला.आंदोलनात भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रवीण तायडे,प्रशांत शेगोकर,राजेश पाठक,सुधीर रसे, मनोहर सुने,बाळासाहेब सोनार, विक्रम पाठक,रमेश मावे,मुरली माकोडे, जयंत आमले,सत्यजीत सिंह राठोड , राजू चिरडे, अतूल गोळे,मनीष मेन, विशाल काकड, देव कुमार बुरंगे,रवी मेटकर, दाळू महाराज, बादल कुलकर्णी, हर्शद नाथ जोगी, सोपान गुळधे, मिलींद चुके, बल्लू कळसकर, विजु टेकाडे, मिलींद सुखे, राजेश नेवारे, समिर हावरे,अजिंक्य वानखडे, निखिल टेकाडे,कुलदीप निर्मळ, निखील भटकर, धम्मदीप नवले, अंकुश सावरकर,प्रमोद हरणे,अशोक ठाकरे, बल्लु भाऊ, आशीष कोरडे,आदी उपस्थित होते