- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : उज्ज्वल प्रतिष्ठान, नांदेड आयोजित प्रशांत नामदेवराव ढोले यांच्या “आंबेडकरी जाणिवांचा अक्षरप्रकाश “या समीक्षा ग्रंथाला”आंबेडकरी समीक्षा सौंदर्य पुरस्कार २०२२प्रदान करण्यात आला.
उज्ज्वल प्रतिष्ठान, कंधार येथील अध्यक्ष मा.प्रकाश ढवळे तसेच निवड समिती प्रमुख मा. प्रज्ञाधर ढवळे हा पुरस्कार जाहीर केलेला होता.मा. भदंत पय्याबोधी थेरो (संचालक, श्रमनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नंदुस्सा, ता, जि. नांदेड यांचा हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रशांत नामदेवराव ढोले यांना प्रदान करण्यात आला.सम्मानचिन्ह, सम्मानपत्र, शाल, बुके हे पुरस्काराचे स्वरूप आहे.
याआधी या समीक्षा ग्रंथला फलटण, जि. पुणे येथील राज्यस्तरीय समीक्षा ग्रंथ पुरस्कार २०२२, तसेच राजा ढाले राजस्तरीय समीक्षा पुरस्कार, नागपूर २०२२हे दोन राजस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहे. परिस पब्लिकेशन, पुणे या दर्जेदार प्रकाशनाने हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.प्रस्तावना जेष्ठ कवी,समीक्षक मा.डाॅ.अशोक नामदेवराव पळवेकर सर यांची आहे.पाठराखण जेष्ठ कवी,समीक्षक, अनुवादक मा.डाॅ.युवराज सोनटक्के(बंगलोर)यांची आहे.हा सन्मान मिळाल्याबद्दल संजय ओरके,अरूण विघ्ने,.भूषण रामटेके,संजय इंगळे ,तिगावकर, तुंबारे साहेब ( गट शिक्षणाधिकारी ,देवळी पंचायत समिती),.सतिश आत्राम,नंदा खडसे,संजय बैस,प्रकाश बनसोड,सौ.पद्मा प्रशांत ढोले,डाॅ.अरविंद पाटील,संजय गोडघाटे,जगदीश भगत,सुरेश मेश्राम, रसपाल शेंदरे,सुरेश भिवगडे,प्रकाश जिंदे,प्रकाश कांबळे, रत्ना यशवंत मनवरे,सौ.प्रीती राकेश वाडीभस्मे,संध्या मसराम, सौ.मयुरी मसराम, सुषमा पाखरे,सौ.आशा भस्मे,सौ.प्रतिभा भगत,सुमित्रा चांदेकर,सौ.प्रविणा मैत्रे,सौ.राजश्री शेरजे,अशोक मौर्य, रवींद्र जवादे, महेन महाजन, दीपक गुढेकर,डाॅ.चंदू पवार, प्रा.प्रविण कांबळे,ज्योती भगत, प्राचार्य जयश्री कोटगीरवार प्रविण ढोले,आई व वडील यांनी अभिनंदन केले आहे.