प्रदूषणामुळे होते केस गळती..!

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

    आजकाल वाढत्या प्रदूषणाचे अनेक दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. विशेष म्हणजेया प्रदूषणामुळेकेस गळण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. महिलाच नाही तर पुरुषांनाही केस गळण्याच्या समस्येने ग्रासलं आहे. प्रदूषित कणांच्या सततच्या संपर्कामुळे केसांच्या वाढीला कारक ठरणार्‍या प्रथनांचं प्रमाण घटतं आणि केस गळू लागतात.

    दक्षिण कोरियातल्या एका कंपनीने केलेल्या एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. या अभ्यासातून केस गळणं आणि प्रदूषण यांचा संबंध दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. म्हणूनच शहरी भागातल्या लोकांमध्ये केसगळतीचं प्रमाण वाढल्याचं पहायला मिळतं.

Leave a comment