लाख असतील
माऊल्या
अन् लाख असतील
सावली
लाखात एक झाली
प्रज्ञा सूर्याची सावली ……
जरी शिकली नाही
शाळा
साहेबांना शिकविले
साहून अपार कष्ट
बोधीसत्व घडविले …..
मृत्युचे रंग किती
रमाई ने पाहिले
शांतपणे सर्व मृत्युना
अश्रू रमाईने वाहिले ….
सरणावर जळत होते
लाकडाचे निखारे
जळत होत रमाईच काळीज
कुणी नाही पाहिले ….
निखाऱ्यातुंन निघाली
प्रज्ञा सूर्याची सावली
कोटी कोटी लेकरांची
माय झाली रमाई माऊली
रमाई माऊली…..
- राजेंद्र क. भटकर
बडनेरा - हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा