- आम्ही पोलीस पोलीस
- दुर्जनांस रे संहारु
- सज्जनांचे रे रक्षक
- नका म्हणू रे लुटारू !!
Contents
hide
- धडा भ्रष्टास शिकवा
- नका घेऊ त्याची बाजू
- एकाच तराजुतून
- सारेच नका रे मोजू !!
- नका धावू भरधाव
- सिग्नल नकाच तोडू
- करा शिस्तीचे पालन
- नियम नका रे तोडू !!
- धरती आमची माता
- वर्दी आमुचे ईमान
- माते साठी वर्दी साठी
- आम्ही अर्पू हाचि प्राण !!
- हाती काठी साधी नसे
- कायदा रक्षक दंडा
- हिणवू नको रे पोरा
- मला वर्दीधारी गुंडा !!
- मीही तुमच्या सारखा
- कळपातील माणूस
- माणुसकीनेच वागू
- सारे होऊन माणूस !!
- गड्या जलातला मासा
- तो झोप घेई रे कैसा
- जावे त्याचेच रे वंशा
- सकळां तेव्हाची कळे !!
- वासुदेव महादेवराव खोपडे
- सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
- अकोला 9923488556