- कापलेले झाड आहे, पेटते हे रान आहे
- जंगलाच्या पाखरांची, आज दानादान आहे
Contents
hide
- वात,पाण्याने विषारी, जीवनाचा घात होतो
- माणसाने माणसाचा, कोंडलेला प्राण आहे
- वाचवावे यामधूनी, माळरानी पामरांना
- वाढलेल्या संकटाची, मानवाला जान आहे
- वृक्ष लावा एक आता,श्वास घेण्या मोकळा हा
- नेक कामी साथ देण्या,का कुणावर तान आहे
- राबती जे लोक तेथे, पोज त्यांची येत नाही
- लावती झाडे कुणी ना, का तयाना मान आहे?
- मग सकाळी रोज धावा, वाढवा आयुष्यमाना
- श्वास घेतो दाम आता, का कुणाला भान आहे
- -अरुण विघ्ने
- फोटो सौजन्य : संदेशजी तुपसुंदरे