रोजच्या फॅशनमध्ये पादत्राणांचंही तितकंच महत्त्व आहे. पेहरावानुसार पादत्राणं घातली जातात. पण काही प्रकारची पादत्राणं वॉर्डरॉबमध्ये असावी.
स्टायलश आणि क्लासी लूकसाठी पॉईंटेड टोजवाले शूज कॅरी करू शकता. पार्टी किंवा ऑफिस अशा ठिकाणी ते चालून जातील. पार्टीसाठी एंबेलश्ड शूजचा पर्याय आहे. हा प्रकार वेस्टर्न कपड्यांवर जास्त उठून दिसतो.
ऑक्सफर्ड शूजचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. ब्राईट रंगांपासून ब्राऊन, ब्लॅक, टॅन अशा रंगांमध्येही ते उपलब्ध आहेत.
पादत्राणांचा आरामदायी पर्याय हवा तर क्रिस-क्रॉस सँडल्स निवडता येतील. ऑफिस किंवा कॅज्युअल ऑकेजनसाठी या सँडल्स चालून जातील. स्टाईल आणि कंफर्ट या दोन्हीचा मिलाफ या निमित्तानं साधता येईल.
पीप टोज, पॉईंटेड हल्स, स्लीप ऑन्स अशा प्रकाराच्या हिल्स चलतीत आहेत. त्यामुळे पार्टीसाठी पादत्राणांची निवड करताना एंबेलश्ड हिल्सचा पर्याय आहे. हिल्सचे चाहते असाल तर हा ऑप्शन नक्की ट्राय करा.