नसाब एक परंपरा…!

नसाब एक परंपरा…!

चोहीबाजूने डोंगरपायथ्याशी वसलेले यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील अंदाजे 4000 हजार लोकसंख्या असलेले करजगांव. गावातील बंजारा समाजातील आदर्श परंपरा म्हणजेच ‘नसाब’ होय. यवतमाळ जिल्ह्याला नक्षलग्रस्त, आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या याच यवतमाळ जिल्ह्याने याच जिल्ह्यातील बंजारा समाजाने महाराष्ट्राला दोन माजी मुख्यमंत्री म्हणून हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतरावजी नाईक साहेब, कै. सुधाकररावजी नाईक साहेब, राज्यपाल म्हणून कै. सुधाकररावजी नाईक, मा. मनोहरराव नाईक अन्न व शिक्षण मंत्री, संजयभाऊ राठोड वनमंत्री, इत्यादी मंत्री दिलेत याचा आम्हास आज गौरव वाटतो.

बंजारा समाजातील तांड्यातील नायक, कारभारी, असामी व गावातील प्रतिष्ठीत नागरीक यांचा जमलेला एक प्रकारचा समन्वय म्हणजेच ‘नसाब’..! आपल्या तांड्यात कोणत्याही प्रकारचे छोटे, मोठे भांडणतंटा, अथवा वादविवाद गावातच नसाबाने सोडविल्या जायचे. तांड्यात सोडविलेले तंटे नसाबाच्या माध्यमातून तंटामुक्त होत असल्याने यात समाजाची कोणत्याही प्रकारची आर्थिक हानी होत नव्हती. शिवाय कोर्ट-कचेरीपासून समाज कोसोदूर रहायचा, गावात एकोपा नांदायचा, मतभेद दूर व्हायचे, पोलिस यंत्रनेवर कोणत्याही प्रकारचा ताण-तनाव नसायचा यातून एकप्रकारे ही देशसेवाच तर घडायची नाही का..? बाकी नसाबासाठी आधी नायकाकडे तक्रार नोंद होते, नंतर नायक कारभारीला फिर्यादीकडे पाठवतो .बाहेरगावच्या नसाबीलाही परिपुर्ण न्याय करनार्या ) बोलावण्यात येते.तिन ते चार दिवसापर्यंत तोडगा डिस्कस होते. नंतर गुन्हेगाराकडुन पंचेर दंड वसुल करतात आणि तो दंड सगळ्याचा खर्च काढुन तांड्याच्या विकास कामासाठी होतो बंजारा समाजाकडून हाच आदर्श महाराष्ट्र शासनाने घेवून मा. आर. आर. पाटील गृहमंत्री यांच्या पुढाकाराने तंटामुक्त गाव योजना महाराष्ट्रात अंमलात आली…! व आज सपंर्ण महाराष्ट्रातील कित्येक गांव तंटामुक्त झालीत व तंटामुक्तीच्या मार्गावर आहेत…! किती मोठे परिवर्तन नाही का..?

– बंडूकुमार धवणे

छाया : शेषराव चव्हाण

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
YouTube
Pinterest
LinkedIn
Instagram