आम्ही दिवाळी आली की फटाके फोडता येणार हा विचार करुन फटाक्यावर कितीही बंदी असली तरी चोरुन लपून फटाके घेतो व कितीही बंदी असली तरी फटाके फोडूनच हा सण साजरा करतो.तसेच एखाद्या गरीबानं जर खायला थोडसं तेल मागीतलं तर आम्ही देत नाही.पण दिवाळीच्या नावावर आम्ही दिव्यात कितीतरी प्रमाणात तेल जाळतो.नव्हे तर केळीच्या झाडाची किंवा सिंदीच्या झाडाची कत्तल करुन पर्यावरणाचीही हानी करतो.ही विचार करण्यासारखी बाब आहे.पण यावर विचार कोण करणार.खरं तर याच दिवाळीत फटाके फोडल्यानं जी नैसर्गीक हानी होते.ती कधीही भरुन निघत नाही.त्यावरही विचार करण्याची गरज आहे.दिवाळी काही फटाके फोडाच असं सांगत नाही.ही दिवाळी अगदी साध्या पद्धतीनं साजरी करता येवू शकते.पण कोण ऐकणार.साधे फटाके फोडू नका म्हटलं तरी लोकं फटाके फोडतात.मग ही तर दिवाळी साजरी करण्याची गोष्ट आहे.तीही साध्या पद्धतीनं.त्याला कोण प्रतिसाद देणार! ही चिंतनीय बाब बनली आहे.तरीही पर्यावरणाचा विचार करुन दिवाळी कशी साजरी करावी यावर लोकांनी विचार करावा व प्रदुषणयुक्त दिवाळी साजरी करावी.कारण तो आपल्या जीवाभावाचा प्रश्न आहे.*
कोरोना व्हायरस आला आणि संपूर्ण देशच नाही तर जग धास्तावलं.त्यातच लाकडाऊन लागलं.या लाकडाऊन दरम्यान कोणीही घराबाहेर पडला नाही.कारण पडायला मनाई होती.त्यातच देश होता नव्हता,तेवढा मागे गेला.काहींनी स्थलांतर केलं.काहींचे त्यात रोजगार गेले.तसा कामधंद्याचा प्रश्न निर्माण झाला.
सरकारनं नागरीकांचे होणारे हाल हाल पाहिले व एक एक करीत सर्व गोष्टी खुल्या केल्या.सर्व काही रामभरोसे ठेवत नव्हे तर जोखीम घेत.यात कोणी कोणी तर सरकारवर ताशेरे ओढायला लागले होते.
कोरोनाचा संसर्ग दोन भागातून जास्त होतो.म्हणून सरकारनं दोन गोष्टी सुरु केल्या नव्हत्या.एक म्हणजे मंदीर व दुसरं म्हणजे शाळा.आज मंदीर सुरु झाली आहेत.उद्या शाळाही होतील.कोरोनाही कदाचित वाढू शकतो.पण आज जी स्थिती देशाची आहे.त्यावरुन वाटतं की आमच्या देशानं कोरोनावर विजय मिळवला आहे.त्याचं कारण म्हणजे दिवाळी साजरी करतांना आलेला अनुभव.
सरकारनं रक्षाबंधन,ईद,गणपती उत्सव,नवरात्रोत्सव तसेच दिवाळीच्या सणालाही बंदी घातली होती.त्यातच दिवाळीली फटाके फोडू नये असे बंधन घातले होते.तसं बंधन दरवर्षीच असतं .तरीही लोकं फटाके फोडतातच.पण यावेळी कोरोनाच्या संकटामुळं फटाके फुटणार नाहीत असं वाटत होतं.पण लोकं ऐकतील तेव्हा ना.लोकांनी दिवाळी जोरात साजरी केली व धुमधडाक्यात फटाकेही फोडले.अवैध केळीच्या व सिंदीच्या झाडांची कत्तलही केली व दिव्यात तेलाचा नाशही केला.
दिवाळीच्या दिवशी एवढे फटाके फुटले की असे वाटत होते की या देशानं कोरोना सारख्या गंभीर आजारावरच विजय मिळवला की काय? एवढा आनंद आणि उत्साह लोकांच्या मनात दिसला.
फटाके फोडणे ही कुप्रथाच आहे.तसेच तेलही जाळणे.कारण एखाद्या गरीबानं जर खायला थोडसं तेल मागीतलं तर आपण ते देणार नाही.पण दिव्यात तेल जाळून नक्कीच आपण महागड्या तेलाचा नाश करतोय.तसेच फटाके फोडू नयेत.कारण या फटाक्यानं आजुबाजूचं वातावरण प्रदुषीत होतं असं जरी सरकार सांगत असलं तरी आम्ही फटाके फोडतोच.परंतू त्याचा पशूपक्षी व सर्व प्राणीमात्रांना त्रासच होतो हे आपल्याला कळतही नाही.काही जणांना कळतेही.पण आपल्याला काय करायचंय याचा विचार करुन ते फटाके फोडतच असतात.खरं तर प्राणीमात्रांचे कान हे संवेदनशील असतात.त्यांना चटकन कोणत्याही संकटांची चाहूल लागते .ज्यावेळी जंगलात वसलेल्या देवीदेवतांची यात्रा भरवली जाते.त्यावेळी त्या जंगलातल्या गृहेत लपलेल्या हिंस्र प्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी फटाक्यांचा वापर केला जातो.तसं लोकं मानतात की फटाके तर दिवाळीला घरासमोर फोडले जातात.त्यांचा कोणत्या जंगली प्राण्यांना त्रास होतो.परंतू आपल्या घरी काही पाळीव प्राणीही असतात.त्यांना त्रास होत नाही काय? त्यांनाही त्रास होतोच.शिवाय प्रदुषण एवढं होतं की लोकांना तसेच प्राणीमात्रांना श्वास घेतांना त्याचा त्रासच होतो.व्यतिरीक्त फटाके फोडल्यावर जमीनीलाही जे हादरे बसतात.जे हादरे बसतात,त्यामुळं पर्यावरण संतूलन बिघडतं.तसेच यासस फटाक्याचा एखादा जळता तुकडा एखाद्या झोपडीवर जावून पडल्यास आग लागण्याचीही भीती असते.
फटाके फोडतांना आपल्याला आनंद मिळतो.पण हा आनंद कसा मिळतो याचा विचारही कोणी केलेला नसेल.हे फटाके बनवितांना कारखान्यात कधी कधी लहान लहान मुलं काम करीत असतात.ही मुलं लाचार व अनाथ असतात.कधी कधी या फटाके कारख्यान्यात या बारुदमुळं त्या मुलांची बोटंही जातात.कधी कधी या फटाक्याच्या गुलानं मोठमोठ्या कामगारांनाही श्वसनाचे आजार होत असतात.
फटाके फोडूच नयेत.कारण ते फोडतांना क्षणभराचा आनंद तर मिळतो.पण जन्मभराचं पंगूपण वाट्याला येतं.आमच्या या फटाक्याच्या आनंदानं जे वातावरण प्रदूषण होतं.ते वातावरण शुद्ध करतांना तारेवरची कसरत करावी लागते.तरीही वातावरण पाहिजे त्या प्रमाणात शुद्ध होत नाही.पर्यायानं ओझोन वायूचीही परत कमी होवू शकते किंवा ओझोन थराला छिद्रही पडू शकते.एवढे घातक प्रमाणात हे प्रदूषण होत असतं.
फटाके दिवाळीला फोडल्यानेच हा सण साजरा होते असे नाही.तर साध्या पद्धतीनंही हा सण साजरा होवू शकतो.पण तसा विचार आपण करायला हवा.महत्वाचं म्हणजे तसा विचार आपण जोपर्यंत करणार नाही.तोपर्यंत दिवाळी प्रदुषणमुक्त होणार नाही.
दिवाळी हा सण का असेना,साजरा नक्कीच करावा.परंतू हा दिवाळी सण साजरा करतांना तो प्रदुषणमुक्त कसा करता येईल याचा विचार नक्कीच करावा.जेणेकरुन पर्यावरण समतोल राखता येईल.तीच आपली गरज आहे.तसेच केळीचे खांब किंवा सिंदीच्या फांद्या लावण्याऐवजी साधे फुलांचे हार लावले तरी दिवाळी साजरी होवू शकते याचा विचार करण्याची गरज आहे.तो आपण करावा.जेणेकरुन दिवाळी हा सण प्रदुषण मुक्त तर करता येईलच.पर्यावरण समतोलही राखता येईल हे विसरता कामा नये.
–अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०
Contents
hide
Related Stories
October 31, 2024
October 19, 2024
September 3, 2024