मी अशा एका देशात राहते की, ज्या देशात 2020 या वर्षी covid-19 सारख्या भयानक रोगांचा सहवास होता. घरातून बाहेर सुद्धा जाता येत नव्हत. असं म्हणतात की आपल्या देशाचा कायदा खूप कडक असतो. पण तस वागणार कोणी नाही. आत्ता दारूचं बघा ना..तेवढ्या कडक lockdown मध्ये सुद्धा आपल्या सरकार ने दारू विकायला परवानगी दिली. का ? कारण देशाची अर्थव्यवस्था सांभाळायची होती. आपला देश हा विकसनशील मार्गावर आहे. माझा हा मुद्दा नाही की सरकार कसं आहे. काय आहे. मला माझ्या लेखातून एवढंच सांगायचं आहे की, आपल्या देशात जास्त प्रमाणात दारूची विक्री केली जाते.एकदा जर माणूस दारू प्यायला ना तो पूर्णपणे दारूच्या आहारी जातो.
आपल्याला असे अनेक किस्से ऐकण्यात येतात, की दारूमुळे घरदार उध्वस्त झालं, नोकऱ्या गेल्या, पण हे सर्वसामन्यांना परवडत नाही…मी तुम्हाला एक माझ्या सोबतच किस्सा सांगते. मी जेव्हा शाळेत शिकत होते ना. तेव्हा ground ची साफ सफाई करत असताना….सर्वात जास्त प्रमाणात दारूच्या बाटल्या भेटतं होत्या… शाळा सुटल्यावर नंतर संध्याकाळी गावातले दारू पिणारे लोक येऊन ग्राउंड वर दारू पित असायचे. दारू पिऊन झाल्यावर दारूच्या बाटल्या तिथेच फोडून टाकायचे..कितेक वेळा तर आमचा पायात पण काच टोचलेत. आम्ही स्वतः वेचून ते नेऊन टाकत होतो. अस म्हणतात की शाळा एक मंदिर आहे. पण एवढं घान कोणी मंदिरात करत का…? शाळेत तुमचेच पाल्य येऊन शिकतात, एवढं पण नाही का समजत….
आजकालची तरुण पिढी सुद्धा असचं करत आहे… आज दारूच्या बाटल्या उचलला, उद्या drink केल्यावर काय होणार आहे.. यामुळे आपला देश विकसित नाहीये.मला एवढंच वाटतंय की आम्ही जे भोगलोय किंव्हा उचलोय तेच आमचा पुढचा पिढीला उचलायला लागू नये….सरकार रोज एक कायदा करतो.. पण त्या कायद्याचे पालन नाही करतं. सरकार ने कडलेला मुंबई दारूबंदी अधिनियम च कायदा हा कायदा काढला पण थोडे दिवस हा कायदा चालला. नंतर कायदा संपला सगळं संपल… आहो रोज मंत्रिमंडळाचे बैठका करून काही उपयोग नाही. अमलात आणायचं असेल तर सरकार स्वतः बाहेर पडून काम करावी लागते. आपल्याला रोज एक news येते, की बेकायदा दारु विकणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ, एवढा कडक कायदा असला असता तर आत्ता पर्यात दारूबंदी झाली असती. कोणत्या राजकीय नेता or मोठ्या मंत्र्यांचे वाढदिवास पण लगेच दारू पिऊन धिंगाणा करतात… एवढा धिंगाणा जर भ्रष्टाचार कमी करण्यात घातला असता,तर आपल देश कुठल्या कुठं गेलं असतं……
आपल्या देशाची तरुण पिढी आज दारूच्या दुकानात, दुसऱ्या दिवशी रोडवर, आणि तिसऱ्या दिवशी गटारमध्ये..हेच तर कित्तेक दिवस झालं चालू आहे..हो माहिती आहे मला दारूबंदी झाल्यावर आपल्या देशाची अर्थव्यवस्था बिघडेल. पण देशाची अर्थव्यवस्थासाठी कितेक परिवाराची अर्थव्यवस्था बिघडत आहे..घरातला कर्ता पुरुष गेल्यावर त्या बाईने तिचा संसार कसा करावा… Liver, kideny वर सूज येणे. त्याचा खर्च कितेकाचे तर संसार सुद्धा उद्धवस्त झालं आहे….म्हणून माझी एवढीच विनंती आहे की दारूबंदी करा….आजची पिढी सुद्धा दारूच्या आहारी गेली आहे.. त्याचं वय किती 17 ते 18 एवढ्या लहान वयामध्ये दारू पीत असतील तर त्याचं पुढे काय होणार…???? हा सर्वात मोठा प्रश्न…..?????जास्त बोले असेन तर माफ करा…जे वाटलं ते मी लिहाल…..
- कुमारी भाग्यश्री व्यंकट घुरघुरे