दशरथ मांझींची प्रेरणादायी भेट!

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

दशरथ मांझी यांचा जन्म १९३४ साली बिहारमधील गया जिल्ह्यातील गेहलौर या छोट्याशा गावात मजूर कुटुंबात झाला.त्याचे कुटुंबिय पडीक जमिनीवर शेती करीत.मजुरीही करीत. त्यांचं जगणं हलाखीचं  होतं. त्यांना शाळेत जाण्याची संधी न मिळाल्याने ते निरक्षर राहिले.मात्र बालपणापासून ते संघर्षशील,जिद्दी होते.
पुढे फाल्गुनी देवी या तरूणीसोबत त्यांचं लग्न झालं.त्यांचं पत्नीवर खूप प्रेम होतं.तिच त्यांच्या जगण्याची प्रेरणा आणि शक्ती होती.त्यांना एक कन्यारत्नही झालं.जीवन कष्टमय असलं तरी आनंददायी होतं.अचानक पत्नी आजारी पडली.तिच्या उपचारासाठीचा दवाखाना ५५कि.मी.अंतरावर होता.त्यासाठीचा रस्ता अवघड पर्वतांवरून जात होता.पत्नीला रूग्णालयात उपचारासाठी घेऊन ते निघाले.हा प्रवास जीवघेणा, खडतर असाच होता.प्रवासाची दगदग सहन न झाल्याने, वाटेतच पत्नी फाल्गुनी देवीचं निधन झालं.या दुखद घटनेचा मांझी यांच्या मनावर आघात झाला. केवळ योग्य रस्ता नसल्याने, पत्नीवर वैद्यकीय उपचार करू शकलो नाही, ही बाब त्यांच्या मनाला लागली.अशी वेळ गावातील इतर व्यक्तीवर येऊ नये,म्हणून हा पर्वत खोदून रस्ता करण्याचा निर्धार त्यांनी केला.केवळ एक हातोडा आणि छन्नी हातात घेऊन १९६० साली त्यांनी एकट्याने या पहाडात रस्ता खोदाई सुरू केली.त्यांना इतर कोणाची साथ मिळाली नाही.ऊन,पाऊस,
थंडी व शारीरिक त्रासांची पर्वा न करता,दिवसभरातील जास्तीत जास्त वेळ ते हेच काम करीत राहिले.कोण काय म्हणतोय,याची पर्वा त्यांनी केली  नाही. रस्ता करायचा हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेऊन ते  अविरतपणे  हे काम  करीत राहिले. सतत २२वर्षे ते या रस्त्याचं काम राहिले.शेवटी १९८२मध्ये ११०मिटर लांब,नऊ मिटर रुंद आणि ७.६ मिटर उंच असा रस्ता तयार झाला.या रस्त्यामुळे गेहलौर  व नजिकच्या शहरातील अंतर ५५कि.मी.वरून १५ कि.मी.एवढं झालं. एका व्यक्तीने कुठल्याही आधुनिक अवजारांशिवाय,पूर्ण केलेलं,अशा प्रकारचं हे एकमेव काम आहे.हे जगातलं एक मानवी आश्चर्य समजलं जातं.

तरीही त्यांच्या या कामाचं कौतूक व्हायला बराच कालावधी जावा लागला.२००६मध्ये बिहार सरकारने मांझी यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.त्यानंतर त्यांच्यावर अनेक डायक्युमेंटरी निघाल्या. विविध संस्थांनी  सन्मानित केलं.त्यांचं काम आणि नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचलं.मिडीयावाल्यांनी भरपूर कौतूक केलं.सुमंत्र घोषाल यांनी २०१३ मध्ये मांझी यांच्या या कामावर ‘ द मौउंटेन मैन ‘ या नावाने पुस्तक लिहिलं.मोठा बोलबोला झाला.तरीही ते आपल्या गेहलौर गावातील छोट्याशा घरातच  सामान्य माणूस म्हणून शेवटपर्यंत  राहिले.२०१५ मध्ये केतन मेहता या ख्यातनाम सिने दिग्दर्शकाने ‘द माऊंटैन मैन ‘
या नावाने सिनेमा काढला.नवाजुद्दीन सिद्दीकी या नटाने मांझी यांची भूमिका बजावली.मात्र सिनेमा प्रदर्शीत होण्याआधीच मांझी यांचं निधन झालं.२०१६ मध्ये बिहार सरकारने गेहलौर येथे एक स्मारक व रस्त्याच्या दोन्ही दिशांना प्रवेशद्वार बनवलं.त्यावर दशरथ मांझी प्रवेशद्वार असं लिहलं.स्मारकाच्या छोट्याशा दर्शनी भागात त्यांचा एक पुतळा उभारलाय.त्याच्या पाठिमागे एक छोट्या सभामंडपात त्यांची समाधीआहे. ती एखाद्या छोट्या मंदिरासारखी  वाटते.तिथं एक दानपेटीही ठेवलीय.आम्ही काल हे सगळं बघितलं.

मांझी यांच्या सन्मानार्थ भारतीय डाक विभागाने २०१८ साली एक विशेष डाक तिकीटही काढलं.मृत्यूनंतर पर्वत पुरष हा किताबही त्यांना देण्यात आलाय.अमीरखानने त्याचा सत्यमेव जयते हा इपिसोड मांझी यांना अर्पण केला होता.सोनू सूद यानेही या कुटुंबाला मोठी मदत करण्याची घोषणा केली होती.प्रत्यक्षात काही धान्य त्यानं पाठवलं.
खूप जणांनी मांझींचं नाव वापरून स्वत:चा गाजावाजा करून घेतला. सिनेमातून केतन मेहताने किती कमावले ते माहिती नाही. पण त्याचे काही पैसे मांझी कुटुंबापर्यंत आले असते तर,त्यांच्या मुलीचा विपन्नावस्थेत मृत्यू झाला नसता.

मांझीचं स्मारक झालं.गेहलौर पर्यटन स्थळ बनलयं.लोक गाड्या घेऊन येताहेत.फोटो,सेल्फी,रील बनवताहेत.आम्हीही ते केलंच.पर्यटनस्थळी हेच तर घडतं.या कामापासून अपवादात्मकच कोणी प्रेरणा घेईल. कारण एक व्यक्ती किती अफाट शारीरिक कष्ट करू शकते, याचं मांझी हे उदाहरण आहे.शारीरिक कष्टाला प्रतिष्ठा मिळणं,ही खऱ्या अर्थाने मांझीला आदरांजली आहे.ते मोठं कठीण आहे. त्यापेक्षा मांझीचा डीपी लावणं सोपं आणि कौतुकाचं आहे….
याबद्दलही माझी तक्रार नाही.

● हे वाचा – शारीरिक शिक्षणाचे महत्त्व..!

मात्र एवढ्या सगळ्या प्रतिष्ठा,मान-सन्मान व कौतूकाने, मांझी व त्याच्या कुटुंबियांच्या कष्टप्रद जीवनात काहीही फरक पडला नाही.किमान त्याची एकुलती एक मुलगी तरी,सुखाचं आयुष्य जगू शकली असती.दूर्देवाने तसं घडलं नाही. त्याची मुलगीही विपन्नावस्थेतच कोविड काळात मरण पावली.जगासाठी ही बातमी नव्हतीच.
पण पाटण्याचा झुंजार,निर्भीड पत्रकार पुष्पराज मांझी कुटुंबियांच्या संपर्कात असतो.केवळ मांझी कुटुंबाचीच नाही तर,या समाजाची स्थिती बदलावी यासाठी लेखणीच्या माध्यमातून सतत प्रयत्न करतोय.मांझीच्या मुलीच्या मृत्युची बातमी,त्याच्याकडं फोटोसह आली.
त्याने ती बातमी फेसबुकवर टाकून,मांझी कुटुंबियांच्या हलाखीवर प्रकाश टाकत श्रध्दांजली वाहिली.ही पोष्ट व्हायरल झाली. शेकडो लोकांनी ती शेअर केली.ती सरकारी बाबूंच्याही लक्षात आली असावी.सायंकाळी माननीय मुख्यमंत्र्यांनी या निधनाबद्दल दु:खं व्यक्त केलं….किती सोपं असतं हे श्रध्दांजली वाहणं आणि दु:खं व्यक्त करणं.किती सहजपणे पुतळे,स्मारकं उभी राहतात…
पण जिवंत माणसांची हलाखी संपविण्यासाठी काहीच घडत नाही…स्वत:ला सेलेब्रिटी म्हणवून घेणारेही जाहिरपणे मदतीची आश्वासनं देतात..लगेच विसरून जातात…संवेदनशीलता ही बाबही आता प्रदर्शनीय बनलीय.गेंड्याच्या कातडीचे लोकही  यात आपल्या प्रतिमा उजळून घेतात.
काल दशरथ मांझी यांचं घर पाहताना असे अनेक विचार डोक्यात थैमान घालीत होते.

काल मांझी यांच्या पुतळ्याजवळ मी सेल्फी घेत असताना,सोबत आलेला राजेश मला हात जोडून नमस्कार करतानाची फोटो काढतो असं म्हणाला. मी त्याला म्हटलं,दगडाच्या मुर्तीसमोर हात जोडणं म्हणजे आदरभाव व्यक्त करणं नाही… मुर्तीला काय कळतो आदर नि अनादर? शारीरिक कष्ट करणं,त्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी कार्यरत राहणं,म्हणजे मांझी विषयी आदरभाव दाखवणं..ते मला जमेल का ते मी बघतो..
त्याला माझं म्हणणं किती कळलं ते माहित नाही पण मी काय बोलतोय,हे मला कळत होतं.

दशरथ मांझी यांच्या या कामाबद्दल मी बऱ्याच वर्षांपूर्वी वाचलं होतं.प्रभावीतही झालो होतो.जमेल तेव्हा हा रस्ता प्रत्यक्ष बघावा,अशी इच्छा मनात होती.ती इच्छा पुष्पराज या मित्रामुळं पूर्ण झाली. मी जिथं जायच्या इच्छा व्यक्त केल्या, त्या सगळ्या त्याने पूर्ण केल्या. मी ३१जानेवारीला दिल्लीत पोचलो.त्याला आज ११दिवस होताहेत. तेव्हापासून तो सावलीसारखा माझ्यासोबत आहे.त्याची सगळी काम बाजुला ठेऊन मला वेळ देतोय.याबद्दल त्याचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत.याची परतफेड मला शक्य नाही.
माझा मनसोक्त पाहुणचार करावा असं त्याला वाटतं.पण मला असा पाहुणचार पचनी पडत नाही.सवयी,शरीर याचा विचार करताना , मी इतरांच्या आग्रहाला प्रतिसाद देत नाही. प्रसंगी माणूस दुखावला तरी मी फिकीर करीत नाही.. याचा थोडासा त्रास पुष्पराजलाही झाला.याला इलाज नाही…
मात्र हा सगळा प्रवास अतिशय संस्मरणीय असा होतोय. पुष्पराज मुळेच तीन राज्ये मला माझ्या दृष्टीने बघता आली.अनेकांना भेटता आलं.शहराबरोबर गाव,खेडंही बघता आलं.खूप काही शिकता आलं,अनुभवता आलं. मी पुष्पराज वर खूष आहे.प्रवासात मित्र कसा असावा याचं तो आदर्श उदाहरण आहे. आमची ही मैत्री आयुष्यभर अशीच टवटवीत राहील, याची मला खात्री आहे.

– दशरथ मांझी यांचा जन्म १९३४ साली बिहारमधील गया जिल्ह्यातील गेहलौर या छोट्याशा गावात मजूर कुटुंबात झाला.त्याचे कुटुंबिय पडीक जमिनीवर शेती करीत.मजुरीही करीत. त्यांचं जगणं हलाखीचं  होतं. त्यांना शाळेत जाण्याची संधी न मिळाल्याने ते निरक्षर राहिले.मात्र बालपणापासून ते संघर्षशील,जिद्दी होते.
पुढे फाल्गुनी देवी या तरूणीसोबत त्यांचं लग्न झालं.त्यांचं पत्नीवर खूप प्रेम होतं.तिच त्यांच्या जगण्याची प्रेरणा आणि शक्ती होती.त्यांना एक कन्यारत्नही झालं.जीवन कष्टमय असलं तरी आनंददायी होतं.अचानक पत्नी आजारी पडली.तिच्या उपचारासाठीचा दवाखाना ५५कि.मी.अंतरावर होता.त्यासाठीचा रस्ता अवघड पर्वतांवरून जात होता.पत्नीला रूग्णालयात उपचारासाठी घेऊन ते निघाले.हा प्रवास जीवघेणा, खडतर असाच होता.प्रवासाची दगदग सहन न झाल्याने, वाटेतच पत्नी फाल्गुनी देवीचं निधन झालं.या दुखद घटनेचा मांझी यांच्या मनावर आघात झाला. केवळ योग्य रस्ता नसल्याने, पत्नीवर वैद्यकीय उपचार करू शकलो नाही, ही बाब त्यांच्या मनाला लागली.अशी वेळ गावातील इतर व्यक्तीवर येऊ नये,म्हणून हा पर्वत खोदून रस्ता करण्याचा निर्धार त्यांनी केला.केवळ एक हातोडा आणि छन्नी हातात घेऊन १९६० साली त्यांनी एकट्याने या पहाडात रस्ता खोदाई सुरू केली.त्यांना इतर कोणाची साथ मिळाली नाही.ऊन,पाऊस,
थंडी व शारीरिक त्रासांची पर्वा न करता,दिवसभरातील जास्तीत जास्त वेळ ते हेच काम करीत राहिले.कोण काय म्हणतोय,याची पर्वा त्यांनी केली  नाही. रस्ता करायचा हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेऊन ते  अविरतपणे  हे काम  करीत राहिले. सतत २२वर्षे ते या रस्त्याचं काम राहिले.शेवटी १९८२मध्ये ११०मिटर लांब,नऊ मिटर रुंद आणि ७.६ मिटर उंच असा रस्ता तयार झाला.या रस्त्यामुळे गेहलौर  व नजिकच्या शहरातील अंतर ५५कि.मी.वरून १५ कि.मी.एवढं झालं. एका व्यक्तीने कुठल्याही आधुनिक अवजारांशिवाय,पूर्ण केलेलं,अशा प्रकारचं हे एकमेव काम आहे.हे जगातलं एक मानवी आश्चर्य समजलं जातं.

तरीही त्यांच्या या कामाचं कौतूक व्हायला बराच कालावधी जावा लागला.२००६मध्ये बिहार सरकारने मांझी यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.त्यानंतर त्यांच्यावर अनेक डायक्युमेंटरी निघाल्या. विविध संस्थांनी  सन्मानित केलं.त्यांचं काम आणि नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचलं.मिडीयावाल्यांनी भरपूर कौतूक केलं.सुमंत्र घोषाल यांनी २०१३ मध्ये मांझी यांच्या या कामावर ‘ द मौउंटेन मैन ‘ या नावाने पुस्तक लिहिलं.मोठा बोलबोला झाला.तरीही ते आपल्या गेहलौर गावातील छोट्याशा घरातच  सामान्य माणूस म्हणून शेवटपर्यंत  राहिले.२०१५ मध्ये केतन मेहता या ख्यातनाम सिने दिग्दर्शकाने ‘द माऊंटैन मैन ‘
या नावाने सिनेमा काढला.नवाजुद्दीन सिद्दीकी या नटाने मांझी यांची भूमिका बजावली.मात्र सिनेमा प्रदर्शीत होण्याआधीच मांझी यांचं निधन झालं.२०१६ मध्ये बिहार सरकारने गेहलौर येथे एक स्मारक व रस्त्याच्या दोन्ही दिशांना प्रवेशद्वार बनवलं.त्यावर दशरथ मांझी प्रवेशद्वार असं लिहलं.स्मारकाच्या छोट्याशा दर्शनी भागात त्यांचा एक पुतळा उभारलाय.त्याच्या पाठिमागे एक छोट्या सभामंडपात त्यांची समाधीआहे. ती एखाद्या छोट्या मंदिरासारखी  वाटते.तिथं एक दानपेटीही ठेवलीय.आम्ही काल हे सगळं बघितलं.

मांझी यांच्या सन्मानार्थ भारतीय डाक विभागाने २०१८ साली एक विशेष डाक तिकीटही काढलं.मृत्यूनंतर पर्वत पुरष हा किताबही त्यांना देण्यात आलाय.अमीरखानने त्याचा सत्यमेव जयते हा इपिसोड मांझी यांना अर्पण केला होता.सोनू सूद यानेही या कुटुंबाला मोठी मदत करण्याची घोषणा केली होती.प्रत्यक्षात काही धान्य त्यानं पाठवलं.
खूप जणांनी मांझींचं नाव वापरून स्वत:चा गाजावाजा करून घेतला. सिनेमातून केतन मेहताने किती कमावले ते माहिती नाही. पण त्याचे काही पैसे मांझी कुटुंबापर्यंत आले असते तर,त्यांच्या मुलीचा विपन्नावस्थेत मृत्यू झाला नसता.

मांझीचं स्मारक झालं.गेहलौर पर्यटन स्थळ बनलयं.लोक गाड्या घेऊन येताहेत.फोटो,सेल्फी,रील बनवताहेत.आम्हीही ते केलंच.पर्यटनस्थळी हेच तर घडतं.या कामापासून अपवादात्मकच कोणी प्रेरणा घेईल. कारण एक व्यक्ती किती अफाट शारीरिक कष्ट करू शकते, याचं मांझी हे उदाहरण आहे.शारीरिक कष्टाला प्रतिष्ठा मिळणं,ही खऱ्या अर्थाने मांझीला आदरांजली आहे.ते मोठं कठीण आहे. त्यापेक्षा मांझीचा डीपी लावणं सोपं आणि कौतुकाचं आहे….
याबद्दलही माझी तक्रार नाही.

मात्र एवढ्या सगळ्या प्रतिष्ठा,मान-सन्मान व कौतूकाने, मांझी व त्याच्या कुटुंबियांच्या कष्टप्रद जीवनात काहीही फरक पडला नाही.किमान त्याची एकुलती एक मुलगी तरी,सुखाचं आयुष्य जगू शकली असती.दूर्देवाने तसं घडलं नाही. त्याची मुलगीही विपन्नावस्थेतच कोविड काळात मरण पावली.जगासाठी ही बातमी नव्हतीच.
पण पाटण्याचा झुंजार,निर्भीड पत्रकार पुष्पराज मांझी कुटुंबियांच्या संपर्कात असतो.केवळ मांझी कुटुंबाचीच नाही तर,या समाजाची स्थिती बदलावी यासाठी लेखणीच्या माध्यमातून सतत प्रयत्न करतोय.मांझीच्या मुलीच्या मृत्युची बातमी,त्याच्याकडं फोटोसह आली.

त्याने ती बातमी फेसबुकवर टाकून,मांझी कुटुंबियांच्या हलाखीवर प्रकाश टाकत श्रध्दांजली वाहिली.ही पोष्ट व्हायरल झाली. शेकडो लोकांनी ती शेअर केली.ती सरकारी बाबूंच्याही लक्षात आली असावी.सायंकाळी माननीय मुख्यमंत्र्यांनी या निधनाबद्दल दु:खं व्यक्त केलं….किती सोपं असतं हे श्रध्दांजली वाहणं आणि दु:खं व्यक्त करणं.किती सहजपणे पुतळे,स्मारकं उभी राहतात…

पण जिवंत माणसांची हलाखी संपविण्यासाठी काहीच घडत नाही…स्वत:ला सेलेब्रिटी म्हणवून घेणारेही जाहिरपणे मदतीची आश्वासनं देतात..लगेच विसरून जातात…संवेदनशीलता ही बाबही आता प्रदर्शनीय बनलीय.गेंड्याच्या कातडीचे लोकही  यात आपल्या प्रतिमा उजळून घेतात. काल दशरथ मांझी यांचं घर पाहताना असे अनेक विचार डोक्यात थैमान घालीत होते.

काल मांझी यांच्या पुतळ्याजवळ मी सेल्फी घेत असताना,सोबत आलेला राजेश मला हात जोडून नमस्कार करतानाची फोटो काढतो असं म्हणाला. मी त्याला म्हटलं,दगडाच्या मुर्तीसमोर हात जोडणं म्हणजे आदरभाव व्यक्त करणं नाही… मुर्तीला काय कळतो आदर नि अनादर? शारीरिक कष्ट करणं,त्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी कार्यरत राहणं,म्हणजे मांझी विषयी आदरभाव दाखवणं..ते मला जमेल का ते मी बघतो..
त्याला माझं म्हणणं किती कळलं ते माहित नाही पण मी काय बोलतोय,हे मला कळत होतं.

दशरथ मांझी यांच्या या कामाबद्दल मी बऱ्याच वर्षांपूर्वी वाचलं होतं.प्रभावीतही झालो होतो.जमेल तेव्हा हा रस्ता प्रत्यक्ष बघावा,अशी इच्छा मनात होती.ती इच्छा पुष्पराज या मित्रामुळं पूर्ण झाली. मी जिथं जायच्या इच्छा व्यक्त केल्या, त्या सगळ्या त्याने पूर्ण केल्या. मी ३१जानेवारीला दिल्लीत पोचलो.त्याला आज ११दिवस होताहेत. तेव्हापासून तो सावलीसारखा माझ्यासोबत आहे.त्याची सगळी काम बाजुला ठेऊन मला वेळ देतोय.याबद्दल त्याचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत.याची परतफेड मला शक्य नाही.
माझा मनसोक्त पाहुणचार करावा असं त्याला वाटतं.पण मला असा पाहुणचार पचनी पडत नाही.सवयी,शरीर याचा विचार करताना , मी इतरांच्या आग्रहाला प्रतिसाद देत नाही. प्रसंगी माणूस दुखावला तरी मी फिकीर करीत नाही.. याचा थोडासा त्रास पुष्पराजलाही झाला.याला इलाज नाही…
मात्र हा सगळा प्रवास अतिशय संस्मरणीय असा होतोय. पुष्पराज मुळेच तीन राज्ये मला माझ्या दृष्टीने बघता आली.अनेकांना भेटता आलं.शहराबरोबर गाव,खेडंही बघता आलं.खूप काही शिकता आलं,अनुभवता आलं. मी पुष्पराज वर खूष आहे.प्रवासात मित्र कसा असावा याचं तो आदर्श उदाहरण आहे. आमची ही मैत्री आयुष्यभर अशीच टवटवीत राहील, याची मला खात्री आहे.

– महारुद्र मंगनाळे,

लातूर

(साभार : फेसबुक)

Leave a comment