- बायको “गोड बातमी” सांगते ते
- ऐकून टचकन डोळ्यात पाणी येते
- तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••
- नर्सने ओंजळीत ठेवलेला काही
- पौंडाचा जीव जबाबदारीच्या प्रचंड
- ओझ्याची जाणीव करून देतो,
- तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••
- बायकोबरोबर जागवायच्या रात्री
- डायपर बदलणे आणि पिल्लाला
- कडेवर घेऊन फेऱ्या मारण्यात
- व्यतीत होउ लागतात,
- तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••
- मित्रांबरोबरच्या पार्ट्या आणि नाके
- नीरस वाटून संध्याकाळी पावलांना
- घराची ओढ लागते,
- तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••
- “लाईन कोण लावणार” म्हणत
- सिनेमाची टिकिटे टेचात ब्लॅकने
- खरेदी करणारा तोच जेव्हा शाळेच्या
- फॉर्मच्या लायनीत पहाटे पासून
- तासंतास इमानदारीत उभा रहतो,
- तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••
- ज्याला उठवताना गजर हात टेकतात
- तोच जेव्हा पिल्लाचा नाजुक हात किंवा
- पाय झोपेत आपल्या अंगाखाली येऊ
- नये म्हणून रात्रभर सावध झोपू लागतो,
- तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••
- खऱ्या आयुष्यात एका झापडित
- कुणालाही लोळवू शकणारा पिल्लाबरो-
- बरच्या खोट्या फाइटिंग मध्ये त्याच्या
- नाजुक चापटीनेदेखील गडाबडा लोळतो,
- तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••••
- स्वतः कमीजास्त शिकला असला तरी
- पोराला “नीट अभ्यास कर रे” असे
- पोट तिडकिने सांगू लागतो,
- तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••••
- आपल्याच कालच्या मेहनतीच्या
- जोरावर आपला आज मजेत जगणारा
- अचानक पोराच्या उद्यासाठी आपलाच
- आज कॉम्प्रोमाइज करू लागतो,
- तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••••
- ऑफिसात अनेकांचा बॉस बनून
- हुकुम सोडणारा शाळेच्या POS मध्ये
- वर्गशिक्षिकेसमोर कोकरु बनून,
- कानात प्राण आणून तिच्या इंस्ट्रक्शन्स
- आज्ञाधारकपणे ऐकत असतो.
- तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••
- आपल्या अप्रेझल आणि प्रमोशन-
- पेक्षासुद्धा तो शाळेच्या साध्या
- यूनिट टेस्टच्या रिझल्टची देखिल
- जास्त काळजी करू लागतो,
- तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••
- आपल्या वाढदिवसाच्या ट्रीट पेक्षा
- पोराच्या बर्थडे पार्टीच्या तयारीत
- तो गुंगुन जातो,
- तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••
- गाडीतून सतत फिरणारा तो
- पोराच्या सायकलची सीट पकडून
- सायकलच्या मागे धावू लागतो,
- तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••
- आपण पाहिलेली दुनिया, केलेल्या
- चूका पोराने करू नयेत म्हणून
- प्रिचिंग सुरु करतो,
- तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••
- प्रसंगी पोराच्या कॉलेज अडमिशनसाठी
- पैशाची थैली सोडतो किंवा याचनेकरिता
- “कॉन्टेक्ट्स” समोर हात जोडतो,
- तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••
- “तुमचा काळ वेगळा होता, आता
- जमाना बदलला, तुम्हाला काय
- कळणार नाही. This is generation gap!”
- असे आपणच केव्हातरी बोललेले संवाद
- आपल्यालाच ऐकू आल्यावर आपल्या
- बापाच्या आठवणीने हळवा होऊन
- मनातल्या मनात त्याची माफी मागतो,
- तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••
- पोरगा शिकून परदेशी जाणार,
- मुलगी लग्न करून परक्या घरी
- जाणार हे दिसत असून त्याकरिता
- स्वतःच प्रयत्न करतो
- तेव्हा तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••
- पोर मोठी करताना आपण कधी
- म्हातारे झालो हे लक्षात येत नाही
- आणि लक्षात येते तेव्हा उपयोग नसतो,
- तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••
- कधी पोरांच्या संसारात अडगळ बनून,
- कधी आपल्या म्हातारीबरोबर वृद्धा-
- श्रमाची पानगळ बनून अगदीच
- नशीबवान असला तर नातवंडांसमवेत चार
- दिवस रमून•••••••कसेही असले तरी
- भावी पिढीला भरभरून आशीर्वाद देत
- कधीतरी सरणावर चढतो,
- तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••••!!
- •••••••तमाम वडिलांना समर्पित. ..!!
- संकलन : कनैय्या नुनसे