आगामी उन्हाळी सुट्ट्याच्या पार्श्वभूमीवर तुमच्याकडे ट्रेकिंगचं प्लॅनिंग सुरू असेल तर काही ठिकाणांचा आवर्जून विचार करा.
कर्नाटकमधल्या कूर्गमध्ये तादयंदामोल हे उंच शिखर आहे. या शिखरावर ट्रेकिंग करताना कूर्गचं विहंगम दृश्य दिसतं. हा ट्रेक सोपा आहे. त्यामुळे लहान मुलांसोबतही तुम्ही डोंगर चढू शकता. उत्तराखंडमध्ये चोप्टा-चंद्रशीला हा ट्रेक मुलांबरोबर करता येण्याजोगा आहे. ट्रेकिंगला नव्याने सुरूवात करणार असाल तर या ट्रेकला जा. या दरम्यान वेगवेगळे पक्षी बघायला मिळतील. हिरवागार निसर्ग, हिमालयातली शिखरं तुम्ही अनुभवू शकता. उत्तराखंडमध्ये व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आहे. ऋषीकेशपासून ३00 किलोमीटर अंतरावर असणारं हे स्थान ट्रेकर्सना आकर्षित करतं. या ठिकाणचं सौंदर्य तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. केरळमधलं चेंब्रा हे शिखरही ट्रेकिंगसाठी उत्तम आहे. या ट्रेकची सुरूवात चहाच्या मळ्यांमधून होते. आजूबाजूचा हिरवागार निसर्ग मन मोहवून टाकतो. मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही छोट्या छोट्या ट्रेल्स आणि ट्रेक्सचं आयोजन केलं जातं.
script async src=”https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js”>