- रात्रच नाही तर दिवसही वैऱ्याचा
- सांगू मी हे आता कुणा कुणा
- गाफील राहू नकोस तू सुखात
- उठा जागे व्हा तुम्ही बहुजना.
- अन्यायकारक कायद्यांविरुद्ध
- तू लढत जा आता नवलढाई
- मारू नकोस केवळ तुझ्या
- बंगल्या गाड्याची बढाई.
- हळूहळू तुझे संविधान भारताचे
- करू पाहत आहे पुरेपूर नष्ट
- खाजगीकरणाचा बाजार मांडून
- व्यर्थ होईल तुझे सारे कष्ट.
- गटातटात तुला विभागून असे
- तुझी हक्काची जागा होईल खाली
- तुला वाचवण्यासाठी येणार का
- तो घटनेचा पहिलवान शक्तिशाली.
- एक एक तुझ्या कायद्यावर
- ते घालतात बरोबर घाला
- सोडून द्या ही बेकी तुम्ही
- आतातरी गुमान एकीने चाला.
- संघर्ष मोठा आहे आजचा
- तू झोपेत काढू नकोस रात्र
- सुरूच ठेव गाव शहरात
- महापुरुषांचे हे विचारसत्र.
- गणेश रामदास निकम
- चाळीसगाव गणेशपूर
- मो.न.७०५७९०४६७७, ९८३४३६१३६४