पुरेशी काळजी घेतली नाही तर दातांच्या नानाविध समस्या उत्पन्न होतात. दातांमध्ये पोकळी निर्माण होणं ही त्यातील एक समस्या आहे. मात्र काही उपायांनी ही समस्या टाळता येऊ शकते. याविषयी..
ॅ दातांमध्ये स्वत:चं संरक्षण करण्याची क्षमता असते. त्याचबरोबर दातांवरचं एनिॅमल टिकवून ठेवण्यात लाळ महत्त्वाची भूमिका बजावते पण तयार होणार्या आम्लाचा हल्ला परतवून लावण्यासाठी एवढं पुरेसं ठरत नाही. आम्लामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होते. दातांची झीजही होते. हे टाळण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.
ॅ दातांची योग्यप्रकारे काळजी घ्यायला हवी.दिवसातून दोन वेळा दात घासायला हवेत. दातांमध्ये अन्नकण अडकणार नाहीत याकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवं. माउथवॉशचा वापर करायला हवा.
ॅ विशिष्ट प्रकारच्या अन्नामुळे तोंडात बॅक्टेरियांची निर्मिती होते. साखर तसंच कबरेदकांमुळे बॅक्टेरियांची झपाट्याने वाढ होते. हे बॅक्टेरिया विशिष्ट प्रकारच्या आम्लाची निर्मिती करतात. या आम्लामुळे दातांवरच्या संरक्षक थराची हानी होते. मध, चॉकलेट, कॅरेमलसारख्या पदार्थांमुळे तोंडात बॅक्टेरियांची वाढ होते. हे बॅक्टेरिया दातांमध्ये पोकळी निर्माण करतात.
ॅ दात आणि हिरड्या आरोग्यदायी राहण्यासाठी फ्लोराइड्सची मोलाची मदत होते. साध्या पाण्यातून फ्लोराइड्स मिळतात. त्यामुळे शक्यतो नळाचं शुद्ध पाणी प्यायला हवं. बाटलीबंद पाण्यातून फ्लोराइड्स काढून टाकले जातात. त्यामुळे असं पाणी पिऊ नये.